Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन शांतेत निवडणूक पार पाडावी

 आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन शांतेत निवडणूक पार पाडावी 


                                              -सिमा होळकर

 

             

        

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील  नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2025 दिनांक 4 नोव्हेंबर  रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी  करिता नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, निवडणूक प्रक्रियेशी संबधित राजकीय पक्ष, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, अधिकारी व कर्मचारी यांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करावे व शांतेत निवडणूक पार पाडावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर यांनी केले आहे.

          

        निवडणूक प्रक्रिया निप:क्ष व निर्भयपणे पार पाडण्यासाठी व आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी  शहरात भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथके कार्यान्वीत करण्यात आली  आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेयसठी  विविध कक्षाची स्थापना करण्यात आली असून, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतही आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या निकालापर्यंत आचारसंहिता प्रभावी राहील. निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून शांत, पारदर्शक व सुरळीत निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर यांनी सांगितले.

             

              पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण 18 प्रभागात 95 हजार 559 मतदार असून यापैकी 47 हजार 194 पुरुष तर 47 हजार 347 स्त्री मतदार आणि इतर 18 मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 750 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 97 मतदान केंद्रावर 01 केंद्राध्यक्ष, 03 मतदान अधिकारी 01 शिपाई व 01 पोलीस 582 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रासाठी दहा राखीव पथके नेमण्यात आली आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी व्हिलचेअर, रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 यावेळेत पंढरपूर नगरपरिषद सभागृह येथे स्विकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून,  नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी  दि.19 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधी असेल. दि. 26 नोव्हें. रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतीम उमेदवार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा  मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments