१० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये झालेला स्फोट दहशतवादी घटना असल्याचे सिध्द झाले आहे.दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर तपास यंत्रणांनी अनेक संशयास्पद स्थळ आपल्या नियंत्रणात घेतले आहेत. त्यामध्ये "अल-फलाह" विद्यापीठाचा समावेश आहे.दिल्लीतील बॉम्बस्फोट आणि "व्हाईट कॉलर्ड"मॉड्युलचा पर्दाफाश झाल्यानंतर हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील मुस्लिमबहुल धौज गावातील अर-फलाह विद्यापीठ आणि त्याचा ७६ एकरचा विस्तीर्ण परिसर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जैश-ए-मोहम्मदने डॉक्टर पेशाच्या माध्यमातून घृणास्पद बॉम्ब हल्ला केला ही देशासह जगासाठी अत्यंत धक्कादायक घटना आहे.डॉक्टर पेशाला दैवी शक्ती मानल्या जाते.परंतु दिल्ली बॉम्ब ब्लास्टनंतर डॉक्टर पेशाला आतंकवाद्यांनी कलंकित केले आहे.त्यांना आता जशास तसे उत्तर देण्याची नितांत गरज आहे.कारण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आतंकवादी हल्ल्याला अंजाम देण्यासाठी संपूर्ण आतंकवादी डॉक्टर पेशातून आपापली रुपरेशा आणि गाईडलाईन ठरवित होते. त्याचप्रमाणे यांचे मनसुबे अत्यंत घातक व भयावह होते कारण हे हल्ले मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर असल्याचा कट तपास यंत्रणेकडुन लक्षात येते.देशातील मोठ्या शहरांमध्ये २०० हुन अधिक धमाके करण्याच्या तयारीत ही आतंकवादी संघटना होती.यामध्ये राजधानीतील इंडिया गेट,कॉन्स्टिट्युशन क्लब, गौरीशंकर मंदिर, रेल्वे स्थानके, दिल्लीतील मॉल, तसेच गुरूग्राम आणि फरिदाबाद येथेही त्यांना घातपात घडवून आणायचा प्लॅन होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.दिल्लीतील हल्ले घडवून आणण्याचे कारस्थान पाकिस्तानमधील "जैश-ए-मोहम्मद" ही संघटना जानेवारी पासून कट रचत होती हेही उघडकीस आले आहे.त्याचप्रमाणे दिल्लीतील धमाका मोठ्या जमावाच्या ठिकाणी करण्याचा विचार होता.परंतु ट्राफीक सिग्नलवर तीन तास आतंकवाद्यांची गाडी थांबल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जाते.तरीही दिल्लीतील बॉम्ब ब्लास्ट हा भयावह असल्याचे दिसून आले. यावरून स्पष्ट होते की आतंकवाद्यांना जात धर्म,पंथ, पेशा,मानुस्की, डॉक्टर,आबालवृद्ध यांच्याशी काहीही देणेघेणे नसतेच त्यांना फक्त दहशत निर्माण करून भितीचे वातावरण निर्माण करणे हाच एकमेव उद्देश असतो हे स्पष्ट होते आणि या हल्ल्याचा सुत्रधार जैश -ए-मोहम्मदच आहे यात दुमत नाही. परंतु यात पाकिस्तान व तेथील संपुर्ण आतंकवादी संघटना यात सहभागी असल्याचे दिसून येते.देशात आतंकवाद्यांनी अनेक हल्ले केलेत परंतु दिल्लीतील बॉम्ब ब्लास्टमध्ये आतंकवाद्यांनी जी टेकनीक आणि टेक्नॉलॉजी वापरली ती अत्यंत घृणास्पद म्हणावी लागेल.कारण जगातील महान आणि जीवनदान देणारा पेशा हा डॉक्टर असतो.परंतु आतंकवाद्यांच्या कारवाईचे अनेक प्लॅन फेल होत आहे असे त्यांच्या मास्टर माईंड व आकांना वाटु लागेल अशा परिस्थितीत आतंकवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी डॉक्टरी पेशेचा वापर करून दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला व यात १३ निरअपराधांचा बळी गेला आणि अनेक जण गंभीररित्या जखमी झालेत.भारतीय सेनेने आतंकवाद्यांची संपूर्णपणे कंबर मोडली आहे आणि मोडत आहे.त्यामुळे आतंकवादी आगबबुला झाले असावे.त्यामुळे डॉक्टरी पेशाचा वापर आतंकवादी हल्ल्यासाठी कसा करता येईल यासाठी गेल्या एक वर्षापासून जैश-ए-मोहम्मदचे आतंकवादी प्रयत्न करीत होते आणि त्याच प्रयत्नातुन आतंकवाद्यांनी दिल्ली बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला ही बाब स्पष्ट होते.दिल्ली बॉम्ब स्फोटात तुर्की कनेक्शन उघडकीस आले आहे.यावरून स्पष्ट होते की या हल्ल्यात फक्त तुर्की किंवा पाकिस्तान नसुन आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना या हल्ल्यात सहभागी असावे असे मला वाटते.कारण भारताची प्रगती अनेक देशांना खुपत असावी त्यामुळे भारत विरोधी देश अशाप्रकारच्या आतंकवादी कारवायांना मदत करीत असावेत.लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर ६ डिसेंबरला मोठा दहशतवादी हल्ला करण्याचे नियोजन आतंकवादी संघटनेचे होते ही बाब सुध्दा उघडकीस आली आहे.अधिकाऱ्याच्या मते फरीदाबाद मॉड्यूल वेळेवर उघडकीस आले नसते, तर ६ डिसेंबरला दिल्लीला हादरवणारा स्फोट झाला असता असेही सरकारी सुत्रांकडून समजते, म्हणजेच आतंकवाद्यांचे मनसुबे भयानक होते.परंतु देशाच्या सुरक्षा एजन्सीने अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात विस्फोटक पकडले व आतंकवाद्यांचे पुढील नियोजन निष्फळ केले.दिल्ली बॉम्ब स्फोटाची अनेक देशांनी निंदा केली.परंतु पाकिस्तान म्हणतो की, दिल्लीतील बॉम्ब ब्लास्ट हा सिलेंडरमुळे झालेला स्फोट आहे.यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानची शेपुट वाकड ते वाकडच! दिल्लीतील बॉम्ब स्फोटावरून स्पष्ट होते की भारतातील काही संघटनांचे तार पाकिस्तान, तुर्कीसह आंतरराष्ट्रीय आतंकवाद्यांशी जुळले असावेत.देशातील जनतेनी आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सरकारला व सुरक्षा विभागाला सर्वोतोपरी मदत करावी.सरकार व सुरक्षा विभाग आपापल्या पद्धतीने कार्य करीत आहे तरीही जनतेचे सहकार्य आवश्यक असते.१० नोव्हेंबर २०२५ देशासाठी काळा दिवस ठरला या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रती शोक संवेदना प्रगट करतो व जखमी झालेले नागरिक ताबडतोब दुरुस्त व्हावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.जय हिंद!
0 Comments