अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा उमेदवाराचा अधिकृत AB फॉर्म प्रदान
अनगर (कटूसत्य वृत्त):– नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी प्रक्रियेला वेग आला असून, भाजपाचा अधिकृत AB फॉर्म सोलापूरचे पालकमंत्री व पक्षाचे स्टार प्रचारक श्री. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या हस्ते माजी पंचायत समिती सदस्य श्री. अजिंक्यराणा राजन पाटील यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत (नाना) चव्हाण विशेष उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. विकास वाघमारे, मोहोळ दक्षिण मंडलाध्यक्ष श्री. सतीश काळे, उत्तर मंडलाध्यक्ष श्री. रमेश माने, तसेच श्री. जयवंत गुंड आणि श्री. मुकेश बचूटे उपस्थित होते.
AB फॉर्म प्रदान झाल्यानंतर नगरपंचायत निवडणुकीत भाजपा अधिक संघटित तयारीसह उतरल्याचे चित्र दिसून आले असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
0 Comments