राज्यासह संपूर्ण देशाच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या भाजप पक्षासोबत राहून मोहोळचा सर्वांगीण विकास करूया
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांची मोहोळ शहरवासीयांना भावनिक साद
संपूर्ण शहरात भाजपाचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा स्वप्नवत विकास होत आहे.आपला भाजपा हा पक्ष डेव्हलपमेंट व्हिजन सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे.
त्यमुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे, ज्येष्ठ नेते राजन पाटील,मार्गदर्शक नागनाथभाऊ क्षीरसागर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण यांनी दिलेल्या उमेदवारीच्या संधीचं सोनं शहराच्या सर्वांगीण विकासाच्या रूपात करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून मी प्रयत्नशील राहणार आहे. अशी ग्वाही नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शितल क्षीरसागर यांनी प्रचारादरम्यान सर्वसामान्यांशी बोलताना दिली.
यावेळी त्यापुढे म्हणाल्या की आपण प्रत्येक सर्वसामान्यांशी संपर्क साधून विकासाबद्दलचे त्यांची अपेक्षा जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत पक्षाचे डेव्हलपमेंट व्हिजन यशस्वीरित्या पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. पक्षाने अतिशय महत्त्वपूर्ण पदावर काम करण्यासाठी मला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या रूपाने दिलेल्या संधीबद्दल मी कृतज्ञताभाव व्यक्त करते असेही यावेळी शितल क्षीरसागर म्हणाल्या.
भाजपच्या अधिकृत उमेदवार शितल क्षीरसागर यांचे पती सुशील क्षीरसागर हे अत्यंत मनमिळावू आणि शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केलेला प्रभाग क्रमांक दहा हा भाजपच्या ताब्यातील मोहोळ शहरातील सर्वाधिक विकसित आणि अद्यावत सोयी सुविधा असलेला प्रभाग आहे. त्यामुळे या विकासाच्या पायलट प्रोजेक्टचा अनुभव संपूर्ण शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होणार आहे. सुशील आणि शितल यांच्या अभ्यासू स्वभावामुळे आणि अजोड पक्षनिष्ठेमुळेच क्षीरसागर परिवाराला उमेदवारीची संधी मिळाली आहे. तर आता शितल यांच्या अतिशय नम्र आणि उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्वामुळे भाजपाला निश्चितपणे विजयी होऊ शकणारा एक युवा चेहरा उमेदवारीच्या रूपात मिळाला आहे. शितल क्षीरसागर यांनी पहिल्याच टप्प्यात परिचय स्वरूपात मतदारांशी संवाद साधत पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रभावी संवाद कौशल्याने करत आपली उमेदवारी आणि भाजपा पक्ष हे मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कसे महत्त्वाचे आहेत हे त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिले आहे.
या प्रचार अभियाना दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
मोहोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शितल सुशील क्षीरसागर यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवत मोहोळ शहरात एक सुशिक्षित आणि युवा उमेदवारास निवडणुकीत महत्वपूर्ण संधी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसापासून शितल सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ शहराच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वार्डातील डोअर टू डोअर प्रचाराला अत्यंत प्रभावी शैलीने प्रारंभ केला आहे. सर्वात प्रथम त्यांनी मोहोळ शहरातील विविध क्षेत्रातील जेष्ठ मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यापासून ते सर्वसामान्य जनतेच्या मनातील विकसित शहराची संकल्पना अत्यंत अस्थेवाईकपणे जाणून घेण्यास प्रारंभ केला आहे. सर्व वरिष्ठ पक्ष नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ शहर आणि तालुक्यातील संपूर्ण भाजप पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील या प्रचारावर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे.

0 Comments