Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीतर्फे आटपाडी नगरपंचायतची निवडणूक ताकदीने लढविणार !

  महाविकास आघाडीतर्फे आटपाडी नगरपंचायतची निवडणूक ताकदीने लढविणार !




महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निर्धार !

आटपाडी (कटूसत्य वृत्त)
            राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्धार उपस्थित सर्व नेत्यांनी एकजुटीने केला .
            राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष  हणमंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नगरपंचायतीची निवडणूक मोठ्या ईर्षेने लढण्यावर एकमत करण्यात आले. देशभरातील जनतेची सुरू असलेली ससेहोलपट यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे . जनता महायुतीच्या सर्व पक्षांना कंटाळली आहे . आटपाडी शहराच्या सर्वांगीण आणि चौफेर विकासासाठी महाविकास आघाडीच सक्षम पर्याय देवू शकते . असे यावेळी अनेकांनी स्पष्ट केले . महाविकास आघाडीच्या सर्व १७ प्रभागातील आणि नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक सर्व उमेदवारांनी शुक्रवार दि . ७ रोजी सायंकाळी ५ . ३० राजारामबापू हायस्कुल येथे वाजता उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले .
          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष, सुरज पाटील, काँग्रेस आयचे नेते इंजिनियर महेशकुमार पाटील पाटील मळा, प्रा. मोहन खरात आंबेडकर नगर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मोहनभाऊ देशमुख, ज्येष्ट समाजवादी नेते आबासाहेब सागर फुले नगर, रासपचे तालुका अध्यक्ष शुभम हाके आंबेबन हाकेवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिकभाई खाटीक, राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे, डी . डी . सी . सी बँकेतील मांजी अधिकारी लक्ष्मणराव मोटे विद्यानगर, युवक नेते अतुल पाटील पाटील मळा, संदिप फुले मापटेमळा, अमोल जाधव सागरमळा, गणेश ऐवळे, नितीन डांगे, समाधान भोसले, विष्णुतेज देशमुख इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
Reactions

Post a Comment

0 Comments