राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताह
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला. सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी,महात्मा विद्यामंदिर प्रशालेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सविता गायकवाड, नेताजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, नेताजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व संस्थेचे माजी सचिव कै.बसवराज कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन,दीपप्रज्वलन व गॅस फुगे हवेत सोडून क्रीडा सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले. दि.२४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत आयोजित क्रीडा सप्ताहात खो खो, लंगडी, संगीत खुर्ची, धावणे स्पर्धा, दोरीवरील उडी, लिंबू चमचा, स्लो सायकल, कॅरम व बुद्धिबळ आदी खेळ घेण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी प्रास्ताविकेत सांगितल्या. प्रमुख अतिथी विद्यानंद स्वामी म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईलवरील खेळ न खेळता, मैदानावरील आपल्या आवडीचे खेळ खेळावे. गायकवाड म्हणाल्या,आरोग्य हिच आपली संपत्ती आहे.खेळातूनच आपल्याला हि संपत्ती कायम स्वरुपी मिळविता येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण कांबळे यांनी केले तर बजरंग शिरसट यांनी आभार मानले.

0 Comments