लोकसभा आणि विधानसभेला झालेली चूक नगर परिषदेला सुधारण घेण्याची शहरवासीयांना चांगली संधी
विरोधकांच्या भावनिक मुद्द्यांना बळी न पडता भाजपच्या व्हिजन सोबत आल्यास पुढील तीस वर्षाचा विकासकायापालट शक्य
भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुजीबभाई मुजावर यांचे महत्त्वपूर्ण मत
मोहोळ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ संवाद दौऱ्या दरम्यान व्यक्त केले मत
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहर हे गेल्या दहा वर्षापासून विरोधी पक्षनेत्यांच्या भावनिक राजकारणाचे सॉफ्ट टार्गेट होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान घेऊन देखील लोकप्रतिनिधींनी मोहोळचे रस्ते,पाणी आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याबाबत उदासीनता दाखवली. विधानसभेचा निकाल होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी आपल्या मोहोळ शहरात विशेष निधीची गोष्ट तर सोडाच मात्र विधानसभेच्या निधीच्या माध्यमातून दहा नारळ देखील विकासकामांचे या शहरात फुटू शकले नाहीत ही निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आपण चालू विकासाला खिळ घालून हे काय करून बसलो ? याचा खऱ्या अर्थाने पश्चाताप सर्वसामान्यांना होताना दिसत आहे. आता ही चूक सुधारायची असेल तर मोहोळ शहरातील सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शितल सुशील क्षीरसागर आणि अन्य सर्व प्रभागातील अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठाम आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुजीबभाई मुजावर मोहोळ शहरातील प्रचार सभा दरम्यान केले.
भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शितल क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ प्रभाग भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुजीबभाई मुजावर यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत विरोधकांच्या भावनिक राजकारणामुळे तसेच सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील चुकीच्या पद्धतीचा नाहक आकस आणि इर्षेच्या राजकारणामुळे मोहोळ शहराची कशी वाताहत आणि ससेहोलपट होतेय याबाबत महत्वपूर्ण बाबी मांडल्या.
भाजपाची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासाच्या पदरात भरीव निधीचे माप कसे पडू शकते याचा सविस्तर विवेचनही यावेळी त्यांनी केले. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी सारासार विचार करत एका सुशिक्षित आणि युवा उमेदवाराची नगराध्यक्ष पदाच्या लोकनियुक्त उमेदवारीसाठी निवड केल्यामुळे मतदारांनी भावनिक मुद्द्यांना बळी न पडता व्हिजन घेऊन पुढे जाणाऱ्या भाजपाला मोठ्या मताधिक्याने विजयी करत मोहोळ शहराच्या भविष्यातील सर्वांगीण विकासाचे साक्षीदार व्हावे असेही महत्त्वपूर्ण आवाहन यावेळी मुजीबभाई मुजावर यांनी केले. याप्रसंगी भाजपाचे सर्व उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व मुद्दे बाजूला पडत आता मोहोळ शहराच्या सर्वांगीण हितासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी कोणता पक्ष आणू शकतो ? तर याचे उत्तर भारतीय जनता पार्टी हेच असल्यामुळे सर्वांचे लक्ष भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीतील यशाकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे, ज्येष्ठ नेते राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्यासारखी भक्कम पाठबळाची किनार लाभल्यामुळे भाजपाचे विकासाचे मुद्दे शहरवासीयांना पटू लागले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.गेल्या दहा वर्षाच्या मोहोळ तालुक्याच्या राजकीय चढउतारामध्ये शहरातील मतदारांनी विरोधी पक्ष इर्षेपोटी घेतलेल्या निर्णयामुळे याचा मोहोळ शहराच्या राजकारणाला फायदा कमी आणि तोटाच जास्त झाला. लोकसभेला भावनिक मुद्द्यावर भरकटून मताधिक्य दिले निधी मात्र मोहोळ तालुक्याला आणि शहराला अगदी तुटपुंजा मिळाला. या बाबी आता उशिरा का होईना शेरवास यांच्या लक्षात येत आहेत त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना प्रचारा दरम्यान पाठिंबा वाढताना दिसत आहे.
सुशील क्षीरसागर
निवडणूक प्रभारी भाजपा
चौकट
मोहोळ शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी मोठ्या पाणीपुरवठा योजना त्याचबरोबर मोहोळ शहर परिसरात औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. मोहोळ येथे कृषी विद्यापीठाच्या मालकीची शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे. त्या ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालय सुरू केल्यास त्याचा मोठा फायदा कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी तंत्रज्ञान शिकण्यासाठी होईल. या सर्व धोरणात्मक बाबी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्रात राज्यात कार्यरत असलेल्या भाजपाची सत्ता मोहोळ नगर परिषदेत येणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही एकदा भाजपाला संधी द्या पुढील पंचवीस वर्षाच्या मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकास विकासाचा रोड मॅप भाजपा करून दाखवेल असेही यावेळी ते म्हणाले. आज राज्यात भाजपाच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये जाऊन तेथील विकासकामांची आणि यशस्वी वाटचालीची सद्यस्थिती पहा तेव्हा आपण कुठे आहोत आणि जग कुठे आहे याची खात्री होईल.
मुजीबभाई मुजावर
जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा

0 Comments