यापुढील काळात मोहोळ शहराला विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी भाजपा हाच सक्षम आणि सर्वोत्तम पर्याय
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा
मोहोळ शहराचे नूतन भाजप नेते बाळासाहेब गायकवाड यांचे प्रचार यात्रे दरम्यान आवाहन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
भारतीय जनता पार्टीने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर या व त्यांच्यासोबतचे वीस नगरसेवकाचे सर्व उमेदवार हे सातत्याने सामाजिक कामात अग्रेसर असणारे आहेत. त्यामुळे मोहोळ शहराला जर विकासाचा मॉडेल बनवायचं असेल तर केंद्रात पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना.जयकुमार गोरे हे निधीची कमतरता भासू देणार नाहीत.त्यामुळे मोहोळ हे विकासाचे मॉडेल होणार हा माझा ठाम विश्वास आहे.आणी त्या मुळेच मी शिवसेना (उबाठा ) सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. असे सांगत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोहोळकरांनी भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे , माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्वच अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारादरम्यान मोहोळ शहरांमध्ये होम टू होम प्रचार करीत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
या होम टू होम प्रचारा प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर प्रभाग ९ चे भाजपा उमेदवार नीलावती द्रोणाचार्य डोके, संतोष वायचळ , वैभव गुंड, प्रभाकर डोके, नाना डोके,कबीर कोरबु ,विष्णुपंत गायकवाड , अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संजव खिलारे , राज्य परिषद सदस्या विजया वडेपल्ली,संगीता खंदारे,माजी नगरसेविका अर्चना संतोष वायचळ,मुजीब मुजावर,नवनाथ गाढवे,छगनआष्टूळ आदी होते.
चौकट
मोहोळ शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पक्षातच आहे .कारण हा पक्ष विकासाचे व्हिजन घेऊन देशामध्ये व राज्यांमध्ये मोठी प्रगती करत आहे. 'सबका साथ सबका विकास' या धोरणानुसार भाजपाने देशात व राज्यात विकासाची मोठी क्रांती केलेली आहे. या क्रांतीत सामील होऊन मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्रात व राज्यात मजबूत सत्ता असणाऱ्या भाजपाच्या पाठीशीच मोहोळकरांनी उभे राहावे बाळासाहेब गायकवाड
नुतन भाजप नेते मोहोळ शहर

0 Comments