Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहराच्या पूर्व भागाच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय मुस्ताक शेख यांनाच

 मोहोळ शहराच्या पूर्व भागाच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय मुस्ताक शेख यांनाच




प्रभात चार मध्ये त्यांच्या परिवारातील उमेदवारीमुळे मुस्ताकभाईंचे पूर्व भागातील पारडे जड

विरोधाला विरोध करण्यापेक्षा प्रभागाला कोट्यावधीचा निधी आणून सर्वांगीण विकास साध्य केल्याने मोठा प्रतिसाद

मोहोळ (साहिल शेख):-


मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागाच्या विकासात्मक वाटचालीचे यश भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नगरसेवक मुस्ताकभाई शेख यांनाच जाते. आजवर प्रभागातून त्यांना अनेकांनी केवळ त्यांची राजकीय प्रतिभा आणि अजातशत्रुता पाहून विरोध केला. मात्र त्यांनी स्वतः कधीही कोणाला व्यक्तिशः विरोध केला नाही. द्वेषभावनेचे राजकारण न करता प्रत्येकाच्या अंतकरणात आपुलकी आणि जिव्हाळ्याने सामावण्याची किमया साध्य केलेल्या या माणुसकीच्या शिलेदाराचे राजकारण बऱ्याचदा संपवण्याचे प्रयत्नही झाले मात्र ते सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने अपयशी ठरले.त्यांची काम करण्याची पद्धत आणि विरोधक असो अथवा पक्षातला प्रत्येकाला समान वागणूक देण्याची त्यांची कार्यशैली त्यांना आजपर्यंतच्या राजकारणामध्ये यशस्वी बनवताना दिसून आली. 
दहा वर्षांपूर्वीचा त्यांचा प्रभाग आणि सध्याचा प्रगत आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी संपन्न असलेला प्रभाग यामध्ये अमुलाग्र बदल करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. कारण त्यांनी ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार यशवंत माने यांच्या सहकार्याने खेचून आणलेल्या निधीतूनच हे विकासाचे स्वप्न साकार होऊ शकले आहे. केवळ विरोध करून आणि टीकाटीपणी करून प्रभागाचा विकास साध्य करता येत नाही. त्यासाठी धडपड आणि हातोटी कायम ठेवावी लागते हे मुश्ताकभाई शेख यांच्या कार्यपद्धतीने तिथून प्रत्येक कार्यकर्त्यांने शिकायला हवे.

चौकट
प्रभागातील आरक्षण सोडतीनंतर त्यांनी निवडणुकीत उतरायचे की नाही याबाबत प्रभागातील सर्वसामान्यांची चर्चा केली. कोणताही प्रभागातील निर्णय प्रभागवासीयांना विचारूनच घेण्याची त्यांची स्वभावशैली त्यांना लोकप्रिय बनवत आली. आरक्षण सोडत झाल्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ही निवडणूक लढवावीच आणि प्रभागातील विकास कामांची जबाबदारी मुश्ताकभाई यांनी यापुढेही अविरत स्वीकारावी असा सूर सर्वसामान्यातून आला. त्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सुविद्य पत्नी शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख यांची उमेदवारी ही प्रभागातील सर्वसामान्यांचेच मनातून आल्यामुळे त्यांना या प्रचारा दरम्यान उमेदवारीच महत्व आणि कमळ पक्षचिन्ह मतदार बंधू-भगिनींना पटवून देताना फारशी अडचणी येताना दिसत नाही.

चौकट
आजवरच्या मुस्ताक भाई शेख यांच्या वाटचालीत राजन पाटील हेच पक्ष आणि राजन मालकांचा विश्वास हेच पक्षचिन्ह या धोरणाने काम केल्यामुळे त्यांच्याकडे आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्याकडे पाहून प्रभागातील जनतेने त्यांनाच विजयी करण्याचा दृढनिश्चय पक्का केला आहे. प्रभागात ठिकठिकाणी त्यांचे होत असलेले स्वागत पाहून मुस्ताकभाई शेख यांच्या सोबतच्या सर्व जिगरबाज कार्यकर्त्यांचे मनोबल आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments