Hot Posts

6/recent/ticker-posts

पक्षश्रेष्ठींचा आधार आणि प्रभागातील मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित

 पक्षश्रेष्ठींचा आधार आणि प्रभागातील मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित




प्रभाग चार चे भाजपा उमेदवार दत्तात्रय खवळे यांचा ठाम विश्वास

टीका टिपणी करण्यापेक्षा प्रभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे कृतार्थ समाधान

मोहोळ (साहिल शेख):-

प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकृत उमेदवार दत्तात्रय खवळे यांच्या प्रचाराचा झंझावत काही केल्या कमी होत नसल्यामुळे विरोधकांना आता टीका करण्यासाठी नवे मुद्दे शोधावे लागत आहेत. काहीही झालं तरी या प्रभागात दत्तात्रय खवळे यांच्याच विकास कामांचा बोलबाला झाल्यामुळे या प्रभागातील लढत ही आता भाजपाच्या पारड्यात जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे दत्तात्रय खवळे यांनी केलेल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हा गेल्या दहा वर्षापासून प्रत्येकाच्या डोळ्यासमोर झाल्यामुळे ते खऱ्या अर्थाने या प्रभागाचे सर्वेसर्वा आणि विकासपुरुष ठरले आहेत.
ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत माजी आमदार यशवंत माने यांच्याकडे अविरतपणे पाठपुरावा करत माझ्या प्रभागासाठी हे काम घ्या, माझ्या प्रभागातील सर्वसामान्यांसाठी या योजनेतून निधी द्या, अशी सातत्याने विनंती करत गेल्या नऊ ते दहा वर्षात दत्तात्रय खवळे यांनी प्रभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. दत्तात्रय खवळे हे अत्यंत मनमोकळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंमत देणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या सभोवताली कार्यकर्त्यांची असलेली गर्दी पाहून विरोधकांना देखील आता प्रचारासाठी माणसे शोधावी लागत आहेत. राजन पाटील यांनी आपली पूर्ण ताकत या प्रभागातील उमेदवार शाहिस्ता मुस्ताकभाई शेख आणि दत्तात्रय मनोहर खवळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केल्यामुळे या प्रभागातील वातावरण पूर्णतः भाजपमय झाले आहे.

चौकट
राजकारण करणे म्हणजे टीकाटिपणी करणे कोणाचा द्वेष करणे हे माझ्या स्वभावात बसत नाही. तर राजकारण करणे म्हणजे माझ्या प्रभागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी दक्ष राहणे हेच माझे तत्व आहे. आज मी जे काही राजकीय क्षेत्रात यश मिळवले आहे त्यामध्ये माझे नेते माजी आमदार राजन पाटील तसेच माझ्या प्रभागातील गोरगरीब मायबाप जनतेचा आशीर्वाद असून ही शक्ती माझ्या पाठीशी असल्यावर कोणतीही अदृश्य शक्ती माझे राजकीय भवितव्य अडचणीत आणू शकत नाही असा मला विश्वास आहे. त्यामुळे आजवर प्रभागासाठी झटत आलोय आणि यापुढेही माझ्या प्रभागासाठीच झटत राहणार निस्वार्थी भाऊनेने आणि प्रामाणिक धोरणाने राजकारण केल्यावर यश मिळतेच असा मला ठाम विश्वास आहे.
दत्तात्रयअण्णा खवळे 
भावी नगरसेवक
Reactions

Post a Comment

0 Comments