Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला– कराड –दापोली बस सुरू करा:–अशोक कामटे संघटना

 सांगोला– कराड –दापोली बस सुरू करा:–अशोक कामटे संघटना



सांगोला (कटूसत्य वृत्त)
  सांगोला ते दापोली थेट बस सेवा सुरू कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारीसाहेब,सांगोला आगार प्रमुख विकास पोफळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात सांगोला ते स्वारगेट बस सेवा पहाटे हंगामी न चालवता ती नियमितपणे 4.30 वा सुरू ठेवावी, व दुपारी सांगोला– कराड–सांगोला या बस सेवेची 
अनेक प्रवाशांची मागणी होत आहे. सांगोला परिसरातील अनेक नागरिक दापोली या ठिकाणी सेवा, व्यवसाय,शिक्षणाकरिता पाटण, कोयनानगर, चिपळूण, खेड,दापोली या विविध भागामध्ये कार्यरत आहेत, तसेच या भागात पर्यटन ठिकाणे ,कृषी विद्यापीठ, असल्याने अनेक विद्यार्थी या भागात शिक्षण घेत आहेत त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी,नागरिकांना वेगवेगळ्या बस बदलून गैरसोईने प्रवास करावा लागत आहे, सोईस्कर व थेट बस सेवा सांगोला तालुक्यातील प्रवाशांकरिता दररोज सांगोला येथून सकाळी 8 वाजता सांगोला ते दापोली एसटी बस सेवा नाझरे,आटपाडी, खानापूर, विटा, कराड, पाटण, कोयनानगर,चिपळूण मार्गे सुरू करावी व सकाळी परतीच्या प्रवासाकरिता दापोली येथून देखील 7.00 वाजता सांगोला बस सोडावी, तसेच पुणे येथे जाण्याकरता हंगामी पहाटे 4.30 वाजता बस सेवा कायमस्वरूपी सुरू करावी त्यामुळे पुणे येथे व्यावसायिक,शासकीय कामानिमित जाणाऱ्या प्रवाशांना 11 पर्यंत पुणे येथे पोहचणे सुलभ होईल व सांगोला –कराड बस दररोज दुपारी 2 वाजता, व परतीच्या प्रवासाकरता कराड येथून सकाळी सहा वाजता सुरू करावी अशी आग्रही मागणी शहीद अशोक कामटे संघटना यांच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी सांगोला आगार प्रमुख विकास पोकळे यांनी सदर या आवश्यक निवेदनाची मागणी लक्षात घेता वरिष्ठ कार्यालयाकडे तसा प्रस्ताव मंजुरी करिता पाठवणार आहे व सांगोलाआगारास नवीन बस मिळणेकामी कामटे संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे सांगितले.
या निवेदनाच्या प्रती प्रताप सरनाईक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई, राज्य व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई,  यांनाही देण्यात आले आहेत.यावेळी भाजपाचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, मकरंद पाटील, सचिन घाडगे, प्रा प्रसाद खडतरे यांचेसह अशोक कामटे संघटनेचे सदस्य,पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:–1)
सध्या सोलापूर विभागात बसेसची कमतरता आहे वरिष्ठ कार्यालयाकडे या समस्या प्रश्न मागणी केली आहे नवीन बस प्राप्त होताच अशोक कामटे संघटनेने मागणी केल्याप्रमाणे सांगोला आगारातून नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे सांगोला दापोली या मार्गावर विविध गावांकडे जाण्याकरिता प्रवाशांची सोय होणार आहे. 
अमोल गोंजारी
विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी ,सोलापूर विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.
चौकट:-
2) 
सांगोला आगारातून दापोली येथे जाण्याकरता दररोज सकाळी पंढरपूर येथून सकाळी 7 वाजता सांगोला– नाझरे– आटपाडी मार्गे दापोली बस ,पुणे(स्वारगेट)येथे पहाटे 4.30 ची बस सुरू करण्याकरिता अनेक प्रवाशांनी मागणी होती, त्यानुसार महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयास संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे . याबाबत एसटी प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन देतेवेळी सांगितले
निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष अशोक कामटे संघटना, सांगोला.
3)
सांगोला आगारातून दापोली, स्वारगेट , कराड बस सेवा सुरू करण्याकरिता विभागीय नियंत्रक यांच्याकडे अशोक कामटे संघटनेने मागणी केल्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवणार आहे, व आगरास नवीन बसेसची कमतरता आहे त्याचा पाठपुरावा कामटे संघटनेने करावा. आम्ही स्वारगेट पहाटेची बस नियमित करणार आहे असे आश्वासन संघटनेस दिले.
 विकास पोफळे, आगार प्रमुख, सांगोला.
Reactions

Post a Comment

0 Comments