Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे पोलीस दलातील विठ्ठल कारंडे ठरले पहिले “आयर्न मॅन

 पुणे पोलीस दलातील विठ्ठल कारंडे ठरले पहिले “आयर्न मॅन




पुणे ( प्रविण शेंडगे ) :(कटूसत्य वृत्त) सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील निंबोडी गावचा सुपुत्र आणि पुणे शहर पोलीस दलातील शिपाई विठ्ठल कारंडे यांनी मलेशियातील लांगकावी बेटावर पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या “आयर्न मॅन” स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला आहे.
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या १०० हून अधिक भारतीय स्पर्धकांमध्ये विठ्ठल कारंडे यांनी चौथा क्रमांक पटकावला असून, पुणे शहर पोलीस दलातील पहिले “आयर्न मॅन” होण्याचा मान मिळवला आहे.

या अत्यंत कठीण आणि मानवी शरीराचा कस लावणाऱ्या स्पर्धेत ४ कि.मी. समुद्रात पोहणे, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.२ कि.मी. धावणे — हे तिन्ही टप्पे केवळ १७ तासांत पूर्ण करायचे असतात. परंतु कारंडे यांनी ही संपूर्ण स्पर्धा फक्त १२ तास ६ मिनिटे ५६ सेकंदांत पूर्ण करून भारताचा मान वाढवला.

शेतकरी कुटुंबातील कारंडे यांनी आपले प्राथमिक शिक्षण निंबोडी गावात, तर बी.ए.पर्यंतचे शिक्षण लोणंद येथे घेतले. २०१२ साली पुणे शहर पोलीस दलात भरती झाल्यानंतर नोकरी, कुटुंब आणि शारीरिक प्रशिक्षण यांचा सुंदर समतोल राखत त्यांनी हा पराक्रम साध्य केला. पहाटे उठून सराव, ड्युटी आणि दिवसातील थोड्याशा विश्रांतीच्या वेळातही सराव सुरू ठेवण्याची त्यांची चिकाटी व जिद्द प्रेरणादायी ठरली आहे.

कारंडे यांना त्यांच्या पत्नी सौ. सुजाता कारंडे यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. तसेच त्यांचे प्रशिक्षक डॉ. योगेश सातव यांनी “तुम्ही निश्चित वेळेत स्पर्धा पूर्ण कराल” असा विश्वास निर्माण करून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले, असे कारंडे यांनी सांगितले.

त्यांच्या या यशामुळे संपूर्ण निंबोडी गाव, सातारा जिल्हा, तसेच पुणे पोलीस दल अभिमानाने भरून गेले आहे. अधिकारी वर्ग, सहकारी पोलीस बांधव आणि नागरिक त्यांच्या या यशाचा मनस्वी अभिमान बाळगत आहेत.

*“लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.”**मानवतेच्या शक्तीला आणि जिद्दीला सलाम"आयर्न मॅन”ऑफ पुणे पोलिस*
*विठ्ठल कारंडे*
Reactions

Post a Comment

0 Comments