सक्षम प्रचार यंत्रणे बरोबर प्रत्येक मतदाराने मतदान करण्यासाठी प्रभाग ९ मध्ये भाजपच्या निलावती डोके यांची यंत्रणा कामाला
प्रचारामध्ये महिला आणि युवकांचा मोठा सहभाग
प्रवीणनाना डोके आणि प्रभाकरदादा डोके यांच्या जनसंपर्कामुळे प्रचाराचा आणखी जोर वाढला
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील निवडणुकीत पहिल्या दिवसापासून आज अखेर पर्यंत भाजपाच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातील अधिकृत उमेदवार निलावती द्रोणाचार्य डोके यांनी आता शहराच्या पश्चिम भागातील प्रचारानंतर मोहोळ शहर परिसरातील उपनगरामध्ये डोअर टू डोअर प्रचाराला दुसऱ्या टप्प्यात जोरदार प्रारंभ केला आहे. एकूण नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा निकालाच्या अगोदरच इतका उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रतिसाद मिळवणाऱ्या निलावती डोके या पहिल्या महिला उमेदवार ठरत आहेत.
त्यांच्या परिवारातील प्रवीण द्रोणाचार्य डोके, प्रभाकर द्रोणाचार्य डोके,स्नुषा पूनम प्रवीण डोके, दिपाली प्रभाकर डोके, वर्षा डोके, निर्मला डोंगरे, अर्चना वायचळ यांनी प्रभागातील महिला सदस्यांसह समर्थ नगर आणि क्रांतीनगर परिसरातील विविध प्रमुख मान्यवरांच्या घरी जाऊन आवर्जून त्यांना भेटून भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि विकासधारा पटवून देत कमळ चिन्हालाच मतदान करण्याचे आवाहन केले.डोके वस्ती परिसरातील शेकडो युवकांनी या प्रभागातील प्रचारांमध्ये मोठा जनसंपर्क वाढवला असून ठीकठिकाणी मतदानाचे प्रात्यक्षिक मतदारांना दाखवत कमळ चिन्ह समोर कसे बटन दाबून निलावती डोके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे, याबद्दलचे मार्गदर्शन केले.
चौकट
निलावती डोके यांचे ज्येष्ठ बंधू आणि नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी उपसभापती बाळासाहेब भाऊ गायकवाड यांनी आपली प्रभागातील संपूर्ण ताकद निलावती डोके यांच्या प्रचारासाठी लावली आहे. निलावती यांचे बंधू विष्णुपंत डोके यांनीही हे देखील प्रभागात तळ ठोकून मतदार यादी तपासून प्रभाग निहाय घरांची संख्या, घरातील मतदारांची संख्या पाहून मतदानाची रणनीती आखत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मत महत्त्वाचे आहे या धोरणातून भ्रमणध्वनी आणि अन्य माध्यमातून मतदानासाठी आपुलकीने आवाहन करणे सुरू आहे. त्यामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याशिवाय विक्रांत गायकवाड, वैभवदाजी गायकवाड यांनी प्रभागातून पदफेरी काढत, कॉर्नर बैठका घेत विविध घटकातील युवकांना संघटित करून प्रचार यंत्रणा सक्षम ठेवली आहे.
.png)
0 Comments