मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या "मोहोळ डेव्हलपमेंट व्हिजनसाठी " शहरवासीयांची साथ आवश्यक
माजी आमदार राजन पाटील यांच्या विकास अनुभवाचा टीम भाजपला होणार मोठा फायदा
टीका -टिपणी आणि आरोप- प्रत्यारोपा पेक्षा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांचे "मिशन डेव्हलपमेंटला" प्राधान्य
मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ नगर परिषदेची निवडणूक गेले काही दिवस टीकेच्या, श्रेयवादाच्या आणि इतर विविध मुद्द्यावर गाजत असताना भाजपा ने मात्र सही दिशा स्पष्ट धोरणाने मोहोळ शहरातील प्रचारावर शत प्रतिशत भाजपा धोरणाने मजबूत पकड मिळवली आहे. भाजपाकडून केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना मतदानाचे आवाहन केले जात असून भाजपाच्या या सकारात्मक प्रचारतंत्राचा मोठा प्रभाव शहरातील मतदारावर पडताना जाणवत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमारभाऊ गोरे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीतील प्रचारावर अंत्यत बारकाईने लक्ष ठेवले असून ज्येष्ठ नेते राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण यांची चाणाक्ष प्रचार रणनीती इतर सर्वपक्षीयांना मागे टाकत सर्वाना सरस ठरताना दिसत आहे.
मतदान केवळ चार दिवसांवर आले असताना आता विकासाच्या आणि राज्य शासनाकडून निधी कोण पूर्ण क्षमतेने देऊ मुद्द्यावर ही निवडणूक आल्यामुळे निश्चितपणे याचा मोठा फायदा भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांना होताना स्पष्टपणे दिसत आहे. उमेदवारी घोषित करण्यापासून ते सक्षम प्रचार यंत्रणा सातत्याने सक्रिय ठेवण्यामध्ये भाजपाच आघाडीवर आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांच्या प्रचाराची मोहोळ शहरातील सर्वात जास्त मतदारापर्यंत सर्वात कमी वेळेत पोहोचण्याचा एक अनोखा विक्रम त्यांनी केला आहे शिवाय त्यांची मतदारांशी संवाद साधण्याची मनमिळाऊ शैली आणि त्यांचे प्रभावी वक्तृत्व हेच त्यांच्या प्रचारातील जमेच्या बाजू ठरत आहेत.मोहोळ शहरातील आत्तापर्यंतच्या प्रचारामध्ये सर्वात प्रभारी चेहरा हा नगराध्यक्षपदाच्या शीतल क्षीरसागर यांचाच असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने भाजपाकडे आहे. त्यामुळे राज्यातील बऱ्यापैकी विकासात्मक निर्णय प्रक्रियेची सूत्रे भाजपच्या हातात असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यामुळे येत्या काळात जर मोहोळचा सर्वांगीण विकास भरीव निधीतून व्हायचा असेल तर आता भाजपा सोबतच रहावे लागेल. तरच येत्या काळात मोहोळच्या विकासाचे आशादायक चित्र साकार होऊ शकेल ही बाब जवळपास प्रत्येक मोहोळ शहरवास यांच्या मनात आता घट्ट होताना दिसत आहे. कारण विरोधी पक्षिय इर्षेपोटी आणि विरोधासाठी विरोध करून मोहोळ शहराच्या पदरात काय पडणार ? विरोधी पक्षातील स्थानिक नेतेमंडळींच्या स्वयंकेंद्रित धोरणात्मक निर्णय लादण्याच्या धोरणामुळे आणखी किती दिवस मोहोळच्या विकासाचा बळी जाणार ?आणखी किती दिवस त्यामुळे प्रामाणिक भावनेने दिलेले आपले मत वाया जाणार ? याबाबत मोहोळवासीयांना आता ठोस निर्णय घेऊन भाजपासोबत जाणे आवश्यक आहे ही बाब भाजपचे ज्येष्ठ नेते मंडळी आता शहरवासीयांना पटवून देत आहेत. यासाठी ते मत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांना आणि सर्व भाजपच्या उमेदवारांना द्यायचे अशी परिपक्व आणि प्रगल्भ धारणा शहरातील सुशिक्षित आणि सुजाण मतदारांची होताना दिसत आहे.
सुशील यांचा स्वभाव सुशील तर शांत स्वभावाच्या शीतल सर्वांना भावल्या..
नावाप्रमाणेच सुशील असलेल्या सुशील क्षीरसागर यांचा स्वभाव ही या निवडणुकीतील भाजपची जमेची बाजू ठरली तर त्यांच्या सुविद्य पत्नी शीतल यांचा शांत स्वभाव देखील मतदारांना चांगलाच भावला आहे.मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीतील सर्वाधिक प्रभावी आणि शाश्वत विजयी होणारा युवा चेहरा शितल क्षीरसागर यांच्या रूपाने भाजपाला मिळाल्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पारडे सुरुवातीपासूनच जड मानले जात आहे. त्यामुळे साहजिकच शीतल क्षीरसागर यांच्या प्रचारातील सकारात्मक वातावरणाचा मोठा फायदा आणि वीस उमेदवारांना देखील होताना दिसत आहे. सर्वात जास्त जागा ह्या भाजपाने जिंकल्यास निश्चितपणे येत्या काळात भाजपाच्या माध्यमातून मोहोळ शहराला विकास कामांची लॉटरी आता विक्रमी नीधी स्वरूपात लागण्याची खात्री भाजप पदाधिकारी बाळगत आहेत.
चौकट
विकासाबद्दलची सकारात्मकता हीच भाजपची प्राथमिकता..
गेल्या दहा दिवसापासूनच्या सर्वपक्षीय प्रचारांमध्ये जुन्या आणि नव्या शिवसेनेने एकमेकांवर टीका करण्याशिवाय इतर कोणतीही बाब समोर आणली नाही. केवळ राजन पाटील भाजप मध्ये आल्यामुळे भाजपला लक्ष करण्याचा विरोधकांचा डाव शहराच्या लक्षात आला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जात असताना या पुढील काळात संपूर्ण मोहोळ शहराच्या विकासाचे व्हिजनच सर्वसामान्यसमोर मांडल्यामुळे आता भाजपला कुठेतरी मोठा प्रतिसाद मिळताना स्पष्टपणे दिसत आहे. यापूर्वी पंढरपूर, बार्शी या शहराच्या विकासाचा बॅकलॉग भाजपने भरून काढल्यामुळे आज ती शहरे प्रगत शहरांमध्ये गणली जात आहेत. आता त्याच धर्तीवर मोहोळ शहरातील विकासात्मक निर्णय प्रक्रिया भाजपकडे आल्यास मोहोळ हे एक स्मार्ट सिटी म्हणून भविष्यात नावाला येईल असा विश्वास मतदारांना वाटत आहे.

0 Comments