Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने 100 जणांचे रक्तदान.

 टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने 100 जणांचे रक्तदान. 




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ला परतावून लावताना शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील व महाराष्ट्र पोलीस दलातील वीर शहिदांना टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी 100 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
       २६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात पोलीस आयुक्त अशोक कामटे , महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एन्काऊंटर स्पेशालिष्ट विजय साळसकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे,मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी शहिद झाले होते.
           यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी,पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे,पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे,पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भिमराव गोळे,पो विलास रणदिवे, संजय पांडेकर, संदीप गिरमकर,शिवाजी जाधव ,
पोलीस हवालदार,शिवाजी परांडे, पो पवार, पो पर्वते,
पोलीस हवालदार ज्ञानदेव सरडे,
पोलीस शिपाई  गणेश इंगोले ,
पोलीस शिपाई समीर खैरे ,
पोलीस शिपाई रशीद मुलाणी,
पोलीस शिपाई सर्जेराव करचे, पोलीस शिपाई निलेश कांबळे ,
पोलीस शिपाई उमेश खराडे, गणेश शिंदे,
 यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते .
         यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या शहिदांना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार,संभाजी ब्रिगेडचे प.महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, पोलीस , मार्केट कमिटीचे संचालक धनंजय मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्र संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल जगताप , पत्रकार सतिश चांदगुडे, पत्रकार नाथा सावंत, पत्रकार श्रीकांत मासुळे, पत्रकार महावीर वजाळे, अधिक पत्रकारांनी  शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
            तर सांगोला येथील रेवनील ब्लड सेंटर या ब्लड बँकेने रक्त संकलित केले. यावेळी स्वाती लोंढे या महिलेने रक्तदान केले.टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते 100 सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments