महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी मध्ये 'संविधान दिन' उत्साहात साजरा...
आज 26 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय संविधान दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून आज महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची गावातून रॅली, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, हस्तकला स्पर्धा ,सेल्फी पॉईंट. असे विविध उपक्रम राबविण्यात आलेले होते. तसेच या कार्यक्रमासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फलके तयार करून आणलेली होती. या फलकांनी रॅलीमध्ये पालकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक नारायण भानवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शोयब बागवान, कॉर्डिनेटर माऊली पवार तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी खूप मोलाचे कष्ट घेतले. यामध्ये 26 /11 या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व संविधान दिनानिमित्त टेंभुर्णी भागातून रॅली काढणारी महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी ही एकमेव शाळा ठरली. यामुळे पालक वर्गातून शाळेचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. सुषमा कदम व आभार शितल लोखंडे यांनी केले.

0 Comments