Hot Posts

6/recent/ticker-posts

खा. शिंदे यांच्या यांच्या हस्ते ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन

 खा. शिंदे यांच्या यांच्या हस्ते ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन





सोलापूर , (कटूसत्य वृत्त):- स्मार्ट सिटीच्या चुकीच्या आणि निकृष्ट कामामुळे वीर फकीरा चौक न्यू बुधवार पेठ मातंग वस्ती परिसर  येथील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत होती. परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात गंभीर अस्वच्छता निर्माण झाली होती. या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता.

ही समस्या युवा नेते रोहित खिलारे व समाज बांधवांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

या निधीतून आज वीर फकीरा चौक न्यू बुधवार पेठ  मातंग वस्ती परिसरातील नवीन ड्रेनेज लाईन, घरजोड कनेक्शन तसेच विविध गल्ली–बोळांमध्ये ड्रेनेज पाइपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे राज्य समन्व्यक सुरेश पाटोळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मनोज यलगुलवार,  युवा नेते राजू क्षीरसागर हे उपस्थित होते 

हे काम सोलापूर महानगरपालिका – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना २०२४-२५ अंतर्गत होत असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे ड्रेनेज लाईन काम  होत असल्याचे तसेच वीर फकीरा तरुण मंडळास युवकांना व्यायाम साहित्य करिता  निधी देण्याचे देखील खासदार शिंदे यांच्याकडे सुरेश पाटोळे व रोहित खिलारे यांनी मागणी केली ती मागणी खासदार प्रणिती ताई  शिंदे यांनी  तात्काळ मान्य करून येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये व्यायाम साहित्य देण्याचे जाहीर केले.

स्थानिक रहिवाशांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर उपाययोजना झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू क्षीरसागर व प्रास्ताविक युवा नेते रोहित खिलारे यांनी व आभार सीमा खिलारे  यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments