प्रभात दहाचा भाजपचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी मेजर तानाजी माने यांची प्रचारात निर्णायक सरशी
प्रभागात पदयात्रेद्वारे मेजर तानाजी माने आणि आरती प्रशांत गाढवे यांनी साधला मतदार बांधवांशी विकास संवाद
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग क्रमांक दहा हा गेल्या अनेक वर्षापासून चा भाजपचा किल्ला ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने या प्रभागातून मेजर तानाजी माने यांना उमेदवारी देत या प्रभागातील सर्वपक्षीय विरोधकांसमोरचे आव्हान कायम ठेवले आहे. मेजर तानाजी माने यांची सुपुत्र डॉ. किरण माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रभागातील प्रचाराचा दुसरा टप्पा आता जवळपास पूर्ण करत आणला आहे. या प्रचाराच्या पहील्याच टप्प्या दरम्यान त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माने वस्ती, गाढवे वस्ती बरोबर मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील कुरुल रस्त्याच्या पूर्वेकडील भागातील प्रत्येक नगरामध्ये मेजर तानाजी माने आणि प्रशांत गाढवे यांच्या परिवारातील सदस्यांनी फिरून प्रत्येक सर्वसामान्यांशी संपर्क साधला आहे. देशातील आणि राज्यातील भाजपची विकास धोरणे पटवून देत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येऊ शकते ही बाब त्यांनी प्रत्येकाला मनोमन पटवून दिली आहे.
चौकट
या दरम्यान महिला भगिनी त्याचबरोबर सर्व मतदारबांधवांना अत्यंत आपुलकीने संवाद साधत या पुढील काळातही या प्रभागातील विकासधारा ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील या प्रभागाचे यापूर्वीचे नगरसेवक आणि सध्याचे भाजप निवडणूक प्रभारी सुशीलभैया क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे पुढे सुरू राहील असा विश्वास यावेळी मेजर तानाजी माने समर्थक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना व्यक्त केला आहे.
चौकट
माने परिवार हा या प्रभागातील एक सुशिक्षित आणि व्यवसाय आणि शेतीदृष्ट्या संपन्न परिवार आहे. त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून कोणतीही फायद्याची अपेक्षा न ठेवता अगदी निरपेक्ष भावनेने या प्रभागाची सेवा करू शकणारा परिवार असल्याची बाब ध्यानात घेऊनच ज्येष्ठ भाजप नेते राजन पाटील यांनी या परिवारावर असलेला विश्वास सार्थ ठरवत यांना उमेदवारीची संधी दिली. अनगरकर -पाटील परिवार आणि भाजप पक्षाच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाचा पुढील विकासाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीत विजयी होणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे माने परिवार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराचा प्रभागातील जोर चांगलाच वाढवत आहेत. आणि त्यामध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे.

0 Comments