निलावती द्रोणाचार्य डोके यांच्या प्रभावी प्रचार यंत्रणेमुळे प्रभाग १० मध्ये भाजपचे जोरदार कमबॅक
डोके परिवारातील महिला सदस्यांनी साधला प्रभागातील महिला मतदार भगिनींशी सुसवांद
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग १० मधील भाजपच्या सर्वसाधारण प्रवर्गातील अधिकृत उमेदवार निलावती द्रोणाचार्य डोके यांच्या प्रचारार्थ महिलांच्या शिष्टमंडळाने जोरदार आघाडी घेत प्रभागात डोअर टू डोअर संपर्क सुरू केला आहे. या दरम्यान प्रभागातील प्रत्येक नगरातील प्रत्येक घरातील प्रत्येक महिला भगिनींशी संवाद साधत भारतीय जनता पक्षाची विकासधारा आणि विकासाची विचारधारा पटवून देण्यासाठी या महिला भगिनींनी निलावती डोके यांच्या प्रचारार्थ महिला वर्गांच्या संपर्क आणि संवाद भेटीवर भर दिला आहे. प्रभागातील ही अभिनव प्रचार यंत्रणा आणि महिला शिष्टमंडळाच्या महिला भगिनींशी होणाऱ्या संवादशैलीने निलावती डोके यांच्या प्रचारातील सर्वसामान्य मतदार भगिनींचा प्रतिसाद निश्चितपणे वाढत आहे.
उमेदवार असलेल्या निलावती द्रोणाचार्य डोके यांच्या परिवारातील स्नुषा पुनम प्रवीण डोके, दिपाली द्रोणाचार्य डोके, रूपाली प्रमोद डोके यांचा यापूर्वीपासूनच या प्रभागातील शेकडो महिला भगिनींशी विविध सांस्कृतिक आणि पारंपारिक हळदी कुंकु सणांच्या निमित्ताने होणाऱ्या उपक्रमामुळे नित्य सुसंवाद आणि विस्तृत परिचय आहे. या गोष्टीमुळे या प्रभागातील महिला मतदारांमध्ये भाजपच्या उमेदवाराबद्दलची वैचारिक अनुकूलता निर्माण करण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे.
चौकट
डोके परिवारातील महिला सदस्यांचे महिला मतदार भगिनी वर्गांशी असलेल्या स्नेहबंधामुळे या प्रभागातील समर्थ नगर, न्यू समर्थ नगर, शाहीर फाटे नगर त्याचबरोबर डोके वस्ती आणि अन्य नगरांमधील महिला भगिनींशी मोठा संपर्क आहे. त्यामुळे या प्रचारा दरम्यान संवाद साधताना या महिला सदस्यांच्या शिष्टमंडळाला प्रचारादरम्यान परिचय प्रदान करण्याच्या फारशा अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे सर्वांशी वन टू वन संवाद साधत त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याबाबत आणि कमळ चिन्हावर सर्वांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी पक्षाला अभिप्रेत असलेली प्रभावी प्रचार यंत्रणा यशस्वी केली आहे.

0 Comments