Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्ताधारी आणि विरोधकांच्या विकासकामातील साटेलोट्यामुळेच एकेकाळच्या प्रगत प्रभागाची अधोगती

 सत्ताधारी आणि विरोधकांच्या विकासकामातील साटेलोट्यामुळेच एकेकाळच्या प्रगत प्रभागाची अधोगती




एकाधिकारशाहीच्या कारभारामुळे निधीचा अपवव्य होऊन प्रभाग बकाल बनल्यानेच शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात

प्रभाग ८ मधील शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार दौलतराव तथा बंडू देशमुख यांची स्पष्टोक्ती

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

मोहोळ शहराच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक आठ मधील राजकारण बदलणे हा माझा आणि आमच्या शिवसेना शिंदे पक्षाचा मुळीच हेतू नाही. तर केवळ कागदोपत्री विकासकामाच्या जोरावर सर्वसामान्यांची दिशाभूल करून राजकारणाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्या राजकीय पक्ष घटकांना या प्रभागातून हद्दपार करणे हेच आमच्या निवडणूक लढवण्याचे रियल मिशन आहे असा घणघणात शिवसेना शिंदे पक्षाचे प्रभाग आठ मधील सर्वसाधारण प्रवर्गातील अधिकृत उमेदवार दौलतराव तथा बंडू देशमुख यांनी केला. निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दौलतराव तथा बंडू देशमुख यांनी आपली निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

प्रभाग क्रमांक आठ हा माझ्यासारख्या स्थानिक उमेदवाराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रभाग कोणत्या पक्षाची बालेकिल्ला स्वरूपातील मक्तेदारी नसून विकासकामे करणाऱ्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय प्रत्येक मतदार बंधू-भगिनींना विश्वासात घेऊन काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे या प्रभागातील आम्ही स्थानिक पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या जिगरबाज शिवसैनिकांनी मिळूनच निवडणूक लढवण्याचा हा निर्णय एकमताने घेत अन्य पक्षांना आव्हान दिले आहे. 

चौकट
यापूर्वी  दोन वेगवेगळ्या पक्षांच्या ताब्यात असलेल्या दोन प्रभागांचा मिळुन  प्रभाग नव्याने निर्माण झाला असल्यामुळे दोन्ही प्रभागांच्या विकासाबाबत सर्वसामान्यांमध्ये कोणताही ताळमेळ आजतागायत जाणवला नाही. त्यामुळे प्रभागात कामे केली असे म्हणून सांगणाऱ्या यापूर्वीच्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांची मागणी आहे त्या ठिकाणी कामे केली की स्वतःच्या सोयीच्या ठिकाणी कामे केली ? याबाबतही जरा माझ्यासह प्रभागातील सर्व मतदारांना स्पष्टीकरण द्यावे. आज बऱ्याच भागात प्रभागातून पायी सुखरूप घरापर्यंत चालत जाता येईल अशी देखील अवस्था नाही. यावरून आपला पंढरीच्या मार्गावर असलेला सर्वांचा हा प्रभाग नक्की कुठे नेऊन ठेवला आहे याचा बोध होईना झाला आहे.
दौलतराव तथा बंडू देशमुख
शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार 
प्रभाग क्रमांक आठ
Reactions

Post a Comment

0 Comments