श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” जत नगरी दुमदुमली
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” सांगली जिल्ह्यातील जतमध्ये दाखल झाल्यानंतर हजारो भक्तांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला. स्वामीनामाच्या जयघोषाने अवघी जत नगरी दुमदुमली.
सांगली जिल्ह्यातील जत येथील मराठा मंदिर श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रांगणात पालखी व पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २८ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २९ वे वर्ष आहे. या पालखी व पादुकांचे पूजन व आरती श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक नंदकुमार सूर्यवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी नम्रता सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामींचा प्रसाद सर्वांना पेढे वाटण्यात आले.
या पालखी पादुका सोहळ्यास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले,उपाध्यक्ष अभय खोबरे,सचिव शामराव मोरे,खजिनदार लाला राठोड,विश्वस्त भाऊ कापसे, सायबण्णा जाधव,पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, शालेय समिती सदस्य प्रभाकरभाऊ जाधव,अन्नछत्र मंडळाचे सदस्य अरविंद शिंदे,प्रशालेचे प्राचार्य शिवाजी शिंदे,उपप्राचार्य शिवाजी भांगरे,पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील,संभाजी सरक,परशुराम भोकरे, केंचप्पा तनंगी,अनिता माळी,राहुल भोसले,पांडुरंग साळुंखे,अमोल कळसकर,रुपाली पाटील,मेघा कोपर्डे,वैष्णवी पवार,अक्कलकोट लायन्स क्लबचे उपाध्यक्ष चेतन जाधव,आर.टी.कोळी,राजू इंगळे, गजानन चव्हाण,कुंडलिक साळे,उमेश घोसरवाडे,पालखी पुरोहीत संजय कुलकर्णी,सोमकांत कुलकर्णी,विश्वंभर पुजारी,प्रशांत शिंदे, महान्तेश स्वामी,न्यासाचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे यांच्यासह भक्तगण सेवेकरी,वारकरी,कर्मचारी आदीजण उपस्थित होते.
चौकट: न्यासाच्यावतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामीभक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध,महिला स्वामीभक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळस्थानी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे येता येत नांही,अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत असे नियोजन ह्या परिक्रमेच्या माध्यमातून होत आहे.
चौकट :न्यासाकडून सर्वोतोपरी सहकार्य :श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्र न्यासाच्यावतीने सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत,आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम राबविले जातात. तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.
चौकट :
भक्तांच्या सेवेर्थ :अन्नछत्र मंडळाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास,यात्रीभुवन,अतिथी निवास या निवासी इमारती कार्यारत असून स्वमिभक्तांच्या सेवेत लवकरच भव्य असे महाप्रसादगृह इमारत रुजू होत असून सध्या महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु झाले आहे. ही भव्य इमारत ५ मजली असून त्यावर ५१ फुटी श्री स्वामींची मूर्ती असणार आहे. ही इमारत वातानुकुलीत असून बांधकाम क्षेत्र १,०९,३९७ चौ,फु. इतके आहे. या इमारतीत एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील व ५००० भाविक प्रतीक्षेत असतील इतक्या क्षमतेची आहे. याचा अंदाजित खर्च रक्कम रु.६५ कोटी इतका अपेक्षित आहे. न्यासाच्या परिसरात सध्या स्वामीभक्तांच्या सेवेत तात्पुरत्या महाप्रसादगृह बरोबरच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर(नवसाचा गणपती),श्री भवानी मातामंदिर, नियोजित महाप्रसादगृह इमारत स्ट्रक्चर,कपिला गाय,उभी स्वामींची मूर्ती,कारंजा,शिवस्मारक,इनडोर- औटडोर जिम,प्रशस्त वाहनतळ, बालोध्यान शिवचरित्र प्रदर्शन हॉल,अग्निशामक,रुग्णवाहिका,राज् य परिवाहन महामंडळाच्या चालक व वाहकांनाकरिता अद्ययावत निवास व्यवस्था,सौर उर्जा प्रकल्प याबरोबरच विविध दिन,उत्सव,पोर्णिमा, चतुर्थी,एकादशी आदी कार्यक्रम न्यास साजरा करते.
चौकट :
सन २०२५-२६ मध्ये ८ महिने पालखी :
गेल्या २८ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील ३८ जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक,मध्यप्रदेश,आंध्रप्रदे श,केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातूनदेखील मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले- ९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५ यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे. सदर पालखी परिक्रमा ही ८ महिने फिरून दिनांक १५ जुलै २०२५ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.

0 Comments