जि.प.पं.समीतीची आघाडीचा निर्णय पक्षाचे बैठकी नंतरच - धैर्यशील मोहिते-पाटील
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
स्थानिक स्वराज्य संस्थांचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत इतर पक्षासोबत युती अथवा आघाडीचा निर्णय अद्यापपर्यंत झाला नाही.निवडणूका जाहीर होताच पक्षाचे बैठकीत आदरणीय शरदचंद्र पवार यांचे ऋशआदेशानुसार घेणार असल्याची माहिती माढ्याचे खासदार धैर्यशील .मोहिते पाटील यांनी टेंभूर्णी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले कि कुर्डुवाडी नगरपालीकेसाठी शिंदे सेनेसोबत झालेली आघाडी ही केवळ नगरपालिकेसाठी असून लोकसभा आणि विधानसभेला ज्या लोक सोबत होते त्याचेसोबत आघाडी केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहिर झाले नंतर पक्षाचे बैठकी नंतरच शरद पवार सुप्रिया सुळे यांचेसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आदेशानुसार आघाडी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले.तसेच माढा मतदार संघात युवकांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन उद्योजक घडवण्यासाठी शिबीरे, मोडनिंब,मेंढापूर एम आयडीसीचा पाठपुरावा चालु आहे, आढेगाव येथे अंडरपास,या योजनेसह जनतेने टाकलेल्या जबाबदा-या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.उजनी प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी,किसान रेल्वे चालु करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे.मोडनिंबमध्ये रेल्वेच्या जागेतील रस्ता अप्रोज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांना भेटून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून हा प्रकल्प झाल्यास मोडनिंब मध्यवर्ती ठिकाणी असून येथून शेतमाल कंटेनर पोर्टवर नेण्यासाठी मदत होणार आहे. तसेच केळीचा दर पाकीस्तानात उत्पादन वाढल्यामुळे आखातातील देशांना केळीची वाहतूक रोडने होत असल्याने परवडत आहे,तर आपल्या देशातील वाहतूक लांबून खर्चीक असल्याने व्यापा-यांनी पाठ फिरवली असल्याने दर घटले आहेत.
तर रशियातील व्यापा-यांशी बोलणे चालू असून लवकरच सकारात्मक निर्णय झाल्यास केळीचे दर वाढण्यासाठी फायदा होईल.यासह टेंभूर्णी धाराशिव रस्त्याही होण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष रावसाहेब देशमुख, माजी सरपंच प्रमोद कुटे,प्रहार संघटनेचे अमोल जगदाळे,केशव गायकवाड,राजू जगताप,आदीजण उपस्थित होते.
फोटो... माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा टेंभुर्णी येथे आल्यानंतर पत्रकार परिषदेच्या वेळी सत्कार करताना प्रहार संघटनेचे सोलापूर व धाराशिव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, ज्येष्ठ पत्रकार विष्णू भाऊ बिचुकले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल जगताप टेंभुर्णी

0 Comments