तिरुपती श्री पद्मावती देवी ब्रम्हमोत्सव मध्ये सोलापुरातील वारकरी दिंडी सोहळा
तिरुपती श्री पद्मावती देवी ब्रम्हमोत्सव मध्ये प्रथमच सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ यांचा रथा समोर वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला. अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्ष व उत्कृष्ट मृदंग वादक ह भ प ज्योतीराम महाराज चांगभले व सोलापुरातील सुप्रसिद्ध गायक ह भ प लक्ष्मण महाराज देविदास यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते. महाराष्ट ही संताची भूमी आहे व सोलापूर जिल्ह्यात भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे मंदिर आहे म्हणून सोलापुरातील या मंडळाला मान मिळाला . या मध्ये वारकरी दिंडी मध्ये वारकरी पाऊल फुगडी काटवट असे विविध वारकरी खेळ सादर करून सांस्कृतिक व पारंपारिक वारकरी खेळ ची परंपरा जोपासली भ प लक्ष्मण महाराज देविदास यांनी तेलगू गीत गाऊन आपली सेवा केली या कार्यक्रमासाठी सोलापूर चे माजी महापौर श्री जनार्दन कारमपुरी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुराधा देविदास,धीरज देविदास , राकेश देविदास ,प्रणिती चांगभले,कौस्तुभ चांगभले , वर्षांराणी चांगभले, अजय मोरे,कुमार गायकवाड , सोमनाथ कोरे ,धनाजी लोहार ,शरयू जगताप,ओम माशाळ,वैष्णवी माशाळ, शहाबाई जगताप यशांक सुरवसे,दक्ष वारे ,गणेश शेटे,श्रेयस सुरवसे कृष्णा वाघमोडे,आदित्य इंगळे ,वेदांत ठाकर,समर्थ जगताप हे दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित होते.
.jpeg)


0 Comments