टेंभूर्णीकरांनी एक रक्कमी थकीत कर भरून ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा– सरपंच सुरजा बोबडे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
टेंभूर्णी शहरातील नागरीकांनी ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर,घरपट्टी,पाणीपट्टीची एक रक्कमी रक्कम ३१ डिसेंबर पर्यंत भरल्यास रक्कमेतून ५० टक्के रक्कम भरून मिळवावी व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे असे व ग्रामपंचायत स्वावलंबी बनविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन टेंभुर्णीच्या लोकनियुक्त सरपंच सुरजा बोबडे यांनी शनिवारी दि.२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केले.
टेंभूर्णी शहरात एकूण वीस कोटी थकीत येणे बाकी आहे.महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात टेंभुर्णी ग्रामपंचायतने सहभाग घेतला असून.थकीत एक रक्कमी कर भरणाऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात आल्याने सरपंच सूरजा बोबडे यांनी केलेल्या अहवानाला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज स्वताहून येत दोन ते तीन लाख रूपये कर जमा होत आहे.इतर नागरीकांनीही थकबाकी अभियान कालावधीत भरून लाभ घ्यावा. नाही भरल्यास ३१ डिसेंबर नंतर याचा लाभ घेता येणार नाही.सर्व १०० टक्के कर भरावा लागणार आहे.तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात टेंभूर्णी ग्रामपंचायत ने अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून हरित टेंभुर्णी अभियान, आरोग्यदायी गाव अभियान,स्वच्छ हरित करण्यासाठी आत्तापर्यंत स्वच्छता मोहीम ,वृक्षारोपण महिला सबलीकरण, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यासारख्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी यांना विविध सुविधा देणे,वृक्षारोपण महिला सबलीकरण आदि कामे चालू असून जनतेच्या सहभागातून गावातील विविध शाळा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.यातून गाव स्वच्छ समृद्ध करण्यासाठी सरपंच सुरजा बोबडे आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य योगेश बोबडे यांनी गावक-याचे सहकार्याने प्रयत्न चालू आहेत.यावेळी उपसरपंच राजश्री नेवसे, ग्रामविकास अधिकारी संजय साळुंके, ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे,गौतम कांबळे, सोमनाथ ताबे, नागनाथ वाघे, तुकाराम डोके,आदिजण उपस्थित होते.

0 Comments