Hot Posts

6/recent/ticker-posts

"पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल"

"पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल" 



*"पोलीस निरीक्षक जाधव यांच्यावरील गुन्हा रद्द"* 

*"धनंजय जाधव यांच्या वरील एफ.आय.आर. खारीज"* 

*"माननीय मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय"* 

टेंभुर्णी:- हकीकत अशी की, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव सन 2009 ते 2011 या कालावधीत टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. निवृत्त पोलीस उप अधीक्षक काशिनाथ तळेकर यांचे वाघेवस्ती नजीकचे शेत धनाजी शिवाजी केदार रा. अरण यांनी दि. 10/10/2009 रोजी जेसीबीने उकारल्याची तक्रार पोलीस ठाणे येथे घेऊन आले होते. परंतु प्रथम दर्शनी सदरची तक्रार ही दिवाणी स्वरूपाची असल्याचे व सदर प्रकरणात वाद-विवाद असल्याचे लक्षात आल्याने तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सदर प्रकरणाची चौकशी तत्कालीन पोलीस हवालदार प्रभाकर पाटील यांच्याकडे देऊन तळेकर यांच्या तक्रारीवरून 21 दिवसानंतर चौकशींती गुन्हा नोंद केला होता. गुन्हा उशिरा नोंदवल्याने तळेकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर इत्यादी ठिकाणी तक्रारी अर्ज करून सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु धनंजय जाधव यांनी गुन्हा नोंद करून कारवाई केली असल्याने अर्ज फाईल करण्यात आला होता. तळेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांचेकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने तब्बल 12 वर्षांनी म्हणजेच सन 2022 साली तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी धनंजय जाधव यांचेवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असताना पोलीस ठाणे टेंभुर्णी येथे शासकीय कर्तव्य पार पाडण्यात कसुरी केली या मथळ्याखाली गुन्हा नोंदवला होता. सदरचा गुन्हा नोंदवून तो उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा यांच्याकडे तपासकामी दिला होता. कर्तव्यामध्ये आपली काहीही चूक नसताना अन्यायाची भावना निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी सदर दाखल केलेल्या गुन्ह्यास उच्च न्यायालय मुंबई येथे सन 2022 साली एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. सदर याचिकेच्या सुनावणी दरम्यान पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घडलेल्या घटनेबाबत व पुराव्यानिशी तंत्रशुद्ध बाजू मांडली. फिर्यादी तळेकर यांनीच आरोपीशी तडजोड केल्याची बाब माननीय उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. माननीय उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावनीत सदर गुन्ह्याच्या तपासास स्थगिती देऊन पोलीस विभागाने याचिकाकर्ता म्हणजेच धनंजय जाधव यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश दिला होता. सदर याचिकेची अंतिम सुनावणी आज रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे झाली. धनंजय जाधव यांच्या विरोधात पोलीस ठाणे टेंभुर्णी येथे नोंद झालेली एफ.आय.आर. रद्द करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या निकालाने प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्यास आणखी कायदेशीर पाठबळ मिळाले असल्याचे मत पोलीस निरीक्षक जाधव यांनी व्यक्त केले आहे. 
याचिकेचे कामकाज मुंबई उच्च न्यायालयातील निष्णात वकील श्री. विवेक साळुंखे यांनी पाहिले.

सोबत:- फोटो जोडला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments