अकलूज नगरपरिषद निवडणुक:
नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत तर नगरसेवक पदासाठी ९१ उमेदवार रिंगणात
अकलूज (कटूसत्य वृत्त):-
अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत आज नगरसेवक पदासाठी एकूण १०१ अर्ज वैध झाले होते तर नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज वैध ठरले होते.आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होते.त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत एका उमेदवाराने माघारी घेतल्यामुळे नगराध्यक्ष पदाची पंचरंगी लढत अकलूजकरांना पहायला मिळणार आहे.तर नगरसेवक पदासाठी १०१ उमेदवारांचे अर्ज वैध झाले होते.आज १० जणांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे ९१ उमेदवारात लढत होणार आहे.
अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर अकलूज नगरपरिषदेत होवून तीन- चार वर्ष होवून गेली.अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अकलूजच्या नागरिकांना पहिल्यांदाच नगरपरिषदेची निवडणूक पहायला मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांबरोबर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून उमा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे आता पाच उमेदवारात लढत होणार आहे.तर नगरसेवक पदासाठी एकूण १०१ अर्ज वैध झाले होते.त्यामधील अनिता चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार),रणजीत भोसले (शरदचंद्र पवार),दिपाली कसबे (अपक्ष), आशुतोष साठे (म.वि.से.) पक्ष, कासीम तांबोळी (काँग्रेस पक्ष), अजित तोरसकर (अपक्ष),दत्तात्रय कांबळे (म.वि.से.),अजित भागवत (अपक्ष),स्वरूप शिंदे (अपक्ष),सुवर्णा गाजरे (अपक्ष) यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.त्यामुळे आता अकलूज नगरपरिषदेची निवडणूकीत ९१ उमेदवारात आहे.तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक पाच उमेदवारात लढत आहे.

0 Comments