Hot Posts

6/recent/ticker-posts

सोमनाथ आवताडे यांची प्रभाग ३ मधून बिनविरोध निवड

 सोमनाथ आवताडे यांची प्रभाग ३ मधून बिनविरोध निवड




मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आमदार समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे यांच्या विरोधात प्रभाग ३ मधूनरिंगणात असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यासोबतच भाजपने मंगळवेढ्यात आपले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून सोमनाथ आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्यांच्या विरोधात 2 उमेदवारांनी अर्ज भरला होता. परंतु आज विरोधातील सर्वांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सोमनाथ आवताडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडीनंतर मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे खाते उघडले आहे. मंगळवेढा ही ‘क’ दर्जाचे नगरपालिका असून याठिकाणी 10 प्रभाग आहेत. 20 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रात सर्वांत लहान नगरपालिका म्हणून या नगरपालिकेची ओळख आहे. सोमनाथ आवताडे यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे सोमनाथ आवताडे हे बिनविरोध निवडले गेले आहेत.

मंगळवेढा नगरपालिकेतील निवडणूक यंदा विशेष चर्चेत होती, कारण सोमनाथ आवताडे पहिल्यांदाच नगरपालिका निवडणूक लढवत होते. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने त्यांचा विजय सहज झाल्याचे दिसून आले.

 आज आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांचे बनतो सोमनाथ अवताडे यांना मंगळवेढा नगरपालिकेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आणले . त्यामुळे आमदारा अवताडे यांच्याकडून आपले बंधू सोमनाथ अवताडे यांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक पदाचीभेट दिली असे म्हणावे लागेल.
आमदार समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ अवताडे यांची मंगळया नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल भोसे ,रड्डे ,नंदेश्वर ,आदी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments