अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त):- वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कधीही
विसरणार नाही. या स्नेहबळावर आणखी जोमाने कार्य करणार असून या सत्काराने आणि आशीर्वादाने आपण भारावलो आहे, असे भावनिक उद्गार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा
करण्यात आला. हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात आयोजित
अभीष्टचिंतन सोहळ्यास शहर, तालुका आणि जिल्ह्यातील असंख्य भाजप नेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहून या उत्सवाला भव्यता प्राप्त करून दिली.
म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी, आमदार देवेंद्र कोठे, शहाजी पवार, मोहोळचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील, वळसंग सूतगिरणीचे राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने, उपसभापती सुनील कळके, संचालक सुरेश हसापुरे, केदार उंबरजे, सुरेश पाटील, श्रीशैल बनशेट्टी, गुरुशांत धुत्तरगावकर, बीज्जू प्रधाने, प्रा. अशोक निंबर्गी, दिलीप सिध्दे, सुशील क्षीरसागर, श्रीशैल नरोळे, सुभाष पाटोळे, उदय पाटील, वैभव बरबडे, अप्पू बिराजदार आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमदार कल्याणशेट्टी यांचा गौरव केला.
अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे महेश इंगळे, भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, इंद्रजित पवार, रामचंद्र होनराव, नन्नूभाई कोरबू, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, दयानंद
बिडवे, प्रभाकर मजगे, शिवशरण जोजन, जलील बागवान, रामचंद्र अरवत, सुरेश गड्डी, सुरेश नागूर, शिवयोगी स्वामी, अतूल मेळकुंदे, उमेश पाटील, अविनाश मडिखांबे, महेश पाटील, प्रशांत लोकापुरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, अमर पाटील, सुधा अळ्ळीमोरे, विपूल दोशी, नाविद डांगे, मुबारक शेख, शिवकुमार कापसे, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, सातलिंग परमशेट्टी, अतूल कोकाटे, विक्रम शिंदे, मल्लिकार्जुन आळगी, विलास कोरे, गजानन पाटील, राजशेखर हिप्परगी, अरविंद ममनाबाद, रामचंद्र बिराजदार, बसवराज हौदे, दयानंद बिडवे, दत्ताकुमार साखरे, महादेव कोगनुरे, सागर तेली, डॉ. शरणू काळे, डॉ. गणेश थिटे, सिध्दाराम टाके, अभी लोकापुरे, परमेश्वर यादवाड, महादेव माने, सुरेश झळकी यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
शिवाय भ्रमणध्वनीवरून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांच्यासह राज्यातील अनेक विधानसभेतील सहकारी, धर्मगुरूंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मंदिर पंच कमिटी, कोष्टी समाज, व्यापारी महासंघ, छत्रपती श्री संभाजी महाराज सोहळा समिती, शिव बसव प्रतिष्ठान, सोन्या मारुती प्रतिष्ठान, साई समर्थ प्रतिष्ठान, श्री शक्तिदेवी नवरात्र महोत्सव मंडळ, नागनाथ नवरात्र महोत्सव, राजे प्रतिष्ठान, पत्रकार संघटना, रिध्दी
सिध्दी गणेश मंदिर समिती, भारत गल्ली नवरात्र महोत्सव यांसारख्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्थांचा सहभाग विशेषत्वाने उठून दिसत होता. या सर्व मंडळांनी शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला.
अनेक मान्यवरांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुका विकासाच्या
दिशेने सातत्याने वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
सहकार्याने महायुती सरकारच्या माध्यमातून अक्कलकोटमधील विविध प्रकल्पांना गती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे व कार्यकत्यांचे स्वागत ज्येष्ठ नेते सिध्देश्वर कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मीलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी व परिवाराच्यावतीने करण्यात आले. प्रारंभी सकाळी हुमनाबाद येथे कुलदैवत वीरभद्रेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन वाढदिवसाचा प्रारंभ करण्यात आला होता. दिवसभर भारतीय जनता पक्ष कार्यालय तसेच कल्याणशेट्टी महाविद्यालयात शुभेच्छुकांची गर्दी ओसंडून वाहत होती.

0 Comments