शेतकरी न्याय हक्क व अधिकारासाठी,पुणे येथे दि. ३ नोव्हेंबरला पत्रकार परिषद झाली:
राष्ट्रसंत तुकडोजी, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि शिवराज्य संकल्पनेतील व्यवस्थेच्या आधारावर सामाजिक कार्याची वाटचाल!
शेतकरी वर्ग अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झाला असून, शेतकऱ्यांचा आक्रोश आणि आत्महत्या सतत वाढत आहेत. शासनाच्या आर्थिक धोरणांमुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि महिलांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे विधवा महिलांचे प्रश्न जटिल स्वरूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक धोरणे आणि तुटपुंजी आर्थिक मदत याविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि शेतकरी, वारकरी, व कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी ही पत्रकार परिषदेतील प्रमुख मागण्या आणि ठराव:-
१.उद्योजक आणि व्यावसायिक कर्ज बुडव्यांना सरकारने कर्जमुक्त केले, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज अनैतिक ठरवून संपूर्ण शेतकरी वर्ग कर्जमुक्त करावा. व
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी बँकेची स्थापना करावी.
२.प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ज्यांच्या शेतजमिनी (धरणे, तलाव, रस्ते व इतर सामाजिक उपक्रम) शासनाने हस्तगत केल्या आहेत, त्यांना कायमस्वरूपी मोबदला आणि नुकसान भरपाईचे भाग भांडवल त्वरित देण्यात यावे.
३.शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा.
शेतकऱ्यांना वेठीस धरणारे वन्यप्राणी संरक्षण कायदा आणि जीवन आवश्यक वस्तू कायदा, अधिग्रहण कायदा यांसारखे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत.
४.देशव्यापी स्वतंत्र कृषी न्यायालयाची मागणी:
कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, लेबर कोर्ट, औद्योगिक कोर्ट, फॅमिली कोर्टाच्या धर्तीवर देशव्यापी जलद गती स्वतंत्र ॲग्रीकल्चर कोर्ट (कृषी न्यायालय) तयार करण्यात यावे.
५.स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाची स्थापना:
सध्याचे कृषी मंत्रालय केवळ उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करते, पण शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर प्रभावी निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी स्वतंत्र शेतकरी मंत्रालय तयार करण्यात यावे.
६.माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये शेती, आरोग्य व तांत्रिक विषय समाविष्ट करण्यात यावेत.
७.घटनात्मक तरतुदीनुसार जीवन जगण्यासाठी हाताला काम द्यावे अन्यथा शासनाने बेरोजगारांना बेकारी भत्ता द्यावा.८. जन सुरक्षा कायदा विधेयक आणि सुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे.
९ पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात.
१०. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वारकरी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वारकरी शिक्षणाद्वारे सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थांना तातडीने अनुदान देण्यात यावे.
पत्रकार परिषदेला खालील मान्यवर उपस्थित होते:१)श्री धनंजय पाटील काकडे ९८९०३६८०५८.(ज्येष्ठ साहित्यिक व सरसेनापती)
अध्यक्ष:- शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघ)
२)श्री दिलीप गायकवाड (अध्यक्ष, चक्रवर्ती छत्रपती शिवराय शेतकरी संघटना)
३)श्री सुरेश पाटील,पुणे, माजी कर्नल (संस्थापक ग्रीन थंब)
४)श्री बाळासाहेब रास्ते (अध्यक्ष, चक्रवर्ती बळीराजा व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र राज्य)
५)श्री भगवान महाराज जाधव (संस्थापक अध्यक्ष, पंचमवेद वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र देहू)
६)श्रीमती डॉ.मानसीताई पाटील, पुणे
७)अकबर शेख (कवी व लेखक, सोलापूर)
८)श्री ॲड.नीरज धुमाळ,पुणे , अध्यक्ष लोकशासन आंदोलन.
९)श्री श्यामकांत पाटील. पुणे.बिल्डर.
सूचना :-
पुणे येथे पत्रकार भवन मध्ये झालेली पत्रकार परिषद दि. 3 नोव्हेंबर 2025.(स्थळ:- पत्रकार भवन , एस.एम. जोशी फाउंडेशन हॉल जवळ, गंज पेठ ,गांजवे चौक पुणे).

0 Comments