मोहोळ नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढविणार : वानकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 11, 2025

मोहोळ नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढविणार : वानकर

मोहोळ नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढविणार : वानकर



मोहोळ (कटूसत्त्या वृत्त):- आपल्या करंगळीला धरून राज्यात आलेली भारतीय जनता पार्टी आपल्यालाच संपवायला निघाली आहे, परंतु शिवसेना कधी संपत नाही. हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे. असे सांगत या ठिकाणचा आमदार सुद्धा कधी म्हणत  नाही मला कुणी निवडून दिले, परंतु कारकून लोक मात्र बोलतायेत विधानसभेला या सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम मीच केले असल्याचे सांगत आहेत. येणारी नगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने स्वबळावर लढवली जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुखगणेश वानकर यांनी केले.


मोहोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने मोहोळ येथे शिवसैनिकाचा संवाद मिळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्हाप्रमुख वानकर हे बोलत होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड म्हणाले की, मी ना जात ना पैसा अशा पद्धतीने काम केले असून येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जनतेतून उमेदवार निवडले जातील. 


जिल्ह्यामध्ये मोहोळ नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, उपप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेविका सीमाताई पाटील, युवा जिल्हाप्रमुख महेश देशमुख, शहराध्यक्ष सत्यवान देशमुख, विक्रम देशमुख, अॅड. महेश कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages