प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी मराठी कवी आणि कवयित्रींना आवाहन.!
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- मनाच्या गाभाऱ्यातून उमटणाऱ्या भावनांना शब्दरूप देणे ही एक दिव्य साधना आहे. प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दांत कवी आणि कवयित्री यांचा अनुभव, वेदना, आनंद, आणि स्वप्ने सामावलेली असतात. अशा असंख्य हृदयस्पर्शी शब्दगुंफण एकत्र आणण्यासाठी 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीस अनुसरून 'शब्द सामर्थ्याचा अभिमान, रचनाकारांचा सन्मान' हे ब्रीदवाक्य अंगीकारून मनामनांना जोडणारा शब्दांचा संगम 'मार्मिक शब्दस्पर्श' हा संपादित प्रातिनिधिक मराठी काव्यसंग्रह 'मार्मिक संवाद प्रकाशन'च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणार आहे.
मान्यवर सहित्यिकांची प्रस्तावना, पाठपृष्ठ स्फूट, आय. एस. बी. एन. (ISBN) आणि विशेष संपादकीय असलेला 'मार्मिक शब्दस्पर्श' हा संपादित संग्रह केवळ कवितांचा नव्हे, तर मराठी रसिक वाचकांच्या मनामनांना जोडणाऱ्या शब्दांचा प्रवास असेल. यासाठी प्रेमविषयक, निसर्गविषयक, सामाजिक, संघर्षयम, नातेसंबंधविषयी, प्रेरणादायी, स्फूर्तिदायक किंवा आत्मशोधात्मक कविता निवड समितीच्या माध्यमातून निवडण्यात येणार आहेत.
मनांना जोडणाऱ्या शब्दांचा संगम असणाऱ्या 'मार्मिक शब्दस्पर्श' या संपादित मराठी काव्यसंग्रहात निवड समितीने स्विकारलेल्या तसेच इतर नियम व निकष मान्य असलेल्या प्रत्येक सन्माननीय कवी आणि कवयित्री यांना प्रत्येकी 'मार्मिक शब्दस्पर्श' या काव्यसंग्रहाच्या दहा प्रती देण्याचा मार्मिक संवाद प्रकाशनचा मानस आहे. तसेच मराठी साहित्य विश्वातील काही मान्यवर साहित्यिक, समीक्षक व पत्रकार यांच्यापर्यंत हा काव्यसंग्रह पोहोचविण्यासाठी प्रकाशक प्रयत्नशील राहणार आहेत. इच्छुकांनी ३० नोव्हेंबर, २०२५ पूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने मार्मिक संवाद प्रकाशन, ओंकार व्यापारी संकुल, पंढरपूर पुणे रोड, के. बी. पी. कॉलेजसमोर, श्री पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, पंढरपूर. तालुका :- पंढरपूर पिन :- 413 304 जिल्हा :- सोलापूर (महाराष्ट्र) संवाद :- 9922514300 ईमेल :- ravisonar1972@gmail.com या पत्त्यावर पाठविण्यासाठी प्रकाशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments