Hot Posts

6/recent/ticker-posts

वंदे मातरम'ला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपातर्फे राज्यात 15 ठिकाणी कार्यक्रम

 वंदे मातरम'ला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपातर्फे राज्यात 15 ठिकाणी कार्यक्रम


भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती
 
          वंदे मातरम’या राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमिताने भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी देशभर 150 ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. राज्यात 15 ठिकाणी या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहभागी होणार आहेतअशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र  चव्हाण यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरेमुख्य प्रवक्ते केशव उपाध्येमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.     
            यावेळी श्री. चव्हाण यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास कथन केला. स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरमने  सर्वसामान्य भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास दिलेली प्रेरणा लक्षात घेऊन या गीताची सार्ध शताब्दी साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गायले जाणार आहेअसे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
            राज्यात भाजपातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीअकोला येथील कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेठाणे येथील कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणरायगड येथील कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईकपुणे येथील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसांस्कृतिक मंत्री आशिष शेलारअहिल्यानगर येथील कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलसातारा येथील कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेजळगाव येथील कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनधुळे येथील कार्यक्रमाला पणन मंत्री जयकुमार रावलछत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेबहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावेकुलाबा ( मुंबई ) येथील कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढामानखुर्द येथील कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचाअंधेरी येथील कार्यक्रमाला मुंबई अध्यक्ष आ. अमित साटममालाड येथील कार्यक्रमाला आ. योगेश सागरसायन येथील कार्यक्रमाला आ. प्रसाद लाड उपस्थित राहणार आहेत.
 
Reactions

Post a Comment

0 Comments