Hot Posts

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न




कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):-  जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळा कसबे तडवळे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न 9 ऑक्टोबर 2025 रोजी पाचवी शिष्यवृत्ती धारक 31विद्यार्थी व मंथन परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत चमकलेल्या सर्व 45 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शाळेत आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा स्काऊट मेळाव्यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल शाळेच्या स्काऊट गाईड पथकाचाही सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सहशिक्षिका ढोणे यांचा संपर्क फाऊंडेशनच्या वतीने आयडियल टीचर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता मिसाळ,अधिव्याख्याता अघोर, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ विस्तार अधिकारी जंगम, सरपंच स्वातीताई जमाले,उपसरपंच हरून शेख,शा.व्य.स. अध्यक्ष सोमनाथ भोसले, सदस्य सुभाष धनके,शुभांगी करंजकर, देवकन्या जमाले,मनीषा दिघे, केंद्रप्रमुख जाकते ,केंद्र शाळा तडवळेचे मुख्याध्यापक नदाफ तसेच सहशिक्षक बाळासाहेब जमाले, जमाले,  चांडगे व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला शिक्षक ढवळे व गीत मंच मधील मुली यांनी स्वागत गीत गाऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सय्यद यांनी केले, तर प्रस्ताविक शाळेचे मार्गदर्शक ,ज्येष्ठ शिक्षक जग्गनाथ धायगुडे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमासाठी पालकांनी वीस हजार रुपये तर शाळेला साऊंड सिस्टिम घेण्यासाठी पंधरा हजार रुपये देणगी यावेळी घोषित केली. गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सुमारे 50 हजार रुपयांची बक्षिसे पालकांतर्फे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताकपिरे व मते यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार आर आर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक  तनमोर,
देशटवाड सर,सर्व शिक्षक व पालक यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments