Hot Posts

6/recent/ticker-posts

विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर

 विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले.
कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपुर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व १०००० मे.टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्माती प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 
यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
 या प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा व माढा लोकसभा कार्यक्षेत्रातील विकासाच्या विविध प्रस्तावांबाबत निवेदन सादर केले.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
मोडनिंब येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल विकसित करणे यामुळे मध्य रेल्वे सोलापूर विभागातील मोडनिंब स्थानक हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, तेथे GCT उभारल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
जीआयएस व जनरेटिव्ह एआय आधारित शेतकरी केंद्रित सिंचन व्यवस्थापन पायलट प्रकल्प उजनी धरण प्रकल्प क्षेत्रात राबविणे. या प्रणालीद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, पिकानुसार सिंचन नियोजन व उत्पादनवाढ साध्य होईल.
मौजे शेलगाव (वां), ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करणे. सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम.
केळी हे पीक “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत” समाविष्ट करण्याची मागणी.शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य व संरक्षण मिळावे यासाठी ही विनंती करण्यात आली.
तीर्थक्षेत्र देहू – पंढरपूर दरम्यान नवीन मेमू रेल्वेगाडी सुरू करणे.भाविक व यात्रेकरूंसाठी हा मार्ग सोयीचा ठरावा म्हणून केंद्र शासनाकडे पाठपुरावा.तसेच
 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत नीरा-देवघर प्रकल्पासाठी निधी मिळविण्यासाठी PIB कडे पाठपुरावा.
प्रलंबित पंढरपूर–लोणंद व जेऊर–आष्टी रेल्वे प्रकल्प तातडीने पूर्ण करणे.ग्रामीण भागातील संपर्क सुविधा वाढविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
आंतरराष्ट्रीय डेफ (श्रवण अपंग) खेळाडूंना रोख रक्कम प्रोत्साहन धोरणाचा लाभ देणे.श्रवण अपंग खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर हा निर्णय आवश्यक आहे असे निवेदन सादर केले.

Reactions

Post a Comment

0 Comments