बेवारस मृतदेहावर नातेपुते पोलीस ठाण्याकडून अंत्यविधी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना नातेपुते पोलिसांच्या माध्यमातून दिसून आली. बेवारस मृतदेहाचा विधिवत अंत्यविधी नातेपुते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला. नातेपुते पोलिस ठाणे हद्दीत फलटण - पंढरपूर बायपास रोडच्या साईडपट्टीत नातेपुते बायपासवर बेवारस मृतदेह (वय ५५ ते ६०) असल्याची माहिती अर्जुन हरिबा पिसाळ यांनी शनिवारी दिनांक ११ रोजी दुपारी दोन वाजता नातेपुते पोलिस ठाण्यात दिली होती. सदर घटनेची माहिती नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यासह धाव घेतली व त्या ठिकाणी पाहणी करून बेवारस मृताची ओळख पटवण्यासाठी सर्वत्र माहिती दिली. सदर मृतदेह चार ते पाच दिवसांपासून पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच मृताची ओळख न पटल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे,पो.ह. देवीदास धोत्रे. पो.कॉ. गोपनीय विभागाचे अमोल देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास चांगण तसेच राजू लोंढे, अर्जुन पिसाळ, ज्ञानेश्वर माने,जयश्री अटक, राहुल सोरटे यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत दफनभूमीत बेवारस मृतदेहास विधिवत दफन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यातून समाजात माणुसकी टिकून आहे, याचा प्रत्यय आला. सदर पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पाटकुलकर करत आहेत.
0 Comments