Hot Posts

6/recent/ticker-posts

गांधी विचारच जगाला तारून नेऊ शकेल - नष्टे

 गांधी विचारच जगाला तारून नेऊ शकेल - नष्टे




अकलूज (कटूसत्य वृत्त):- "येणाऱ्या काळात गांधी विचारच जगाला तारून नेऊ शकेल", असे मत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठल नष्टे यांनी व्यक्त केले.
येथील शंकराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या  लालबहादूर शास्त्री व गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले.यावेळी  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र समन्वयक डॉ.बाळासाहेब मुळीक . डॉ.जनार्दन परकाळे, डॉ. विजय शिंदे विजय शिंदे, प्रा.स्मिता पाटील, प्रा.रविराज माने, प्रा.विनायक माने प्रा. रोहित कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी निबंध, रांगोळी व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत कार्यप्रसिद्धी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये परिसर स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, आरोग्य तपासणी, सर्प विज्ञान कार्यशाळा, वृक्षदिंडी व वृक्षारोपण, विविध स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले.
 सूत्रसंचालन डॉ.विजय शिंदे यांनी तर आभार डॉ. सज्जन पवार यांनी मानले.
सप्ताहातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments