अकलूज येथे महात्मा गांधी यांना अभिवादन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गांधी चौक येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तर लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुंभार, उत्तराधिकारी सूर्यकांत कुरुडकर, महादेव दळवी, नेताजी माने,शिवाजी होनमाने, नवनाथ चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष विनोद कुमार दोशी, सतीश दिवटे ,सुधाकर कुंभार, तुकाराम टिंगरे, अन्नदाते गुरुजी, महाबळेश्वर कुंभार ,दादा राऊत अकलूज नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयसिंग खुळे, प्रशासकीय अधिकारी राजाराम नरोटे, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल मोरे, बंटी जगताप, विशाल फुले ,रेश्मा गायकवाड, दादा तांबोळी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments