Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री कमलाभवानी भक्तीगीत निर्मितीमागील कलाकारांना ट्रस्टचा सन्मान

 श्री कमलाभवानी भक्तीगीत निर्मितीमागील कलाकारांना ट्रस्टचा सन्मान




करमाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीदेवीचा माळ येथील लोकभावनांचा केंद्रबिंदू असलेल्या श्री कमलाभवानी मातेस वंदन करणारी गाणी तयार करून मातेचा महिमा देशभर पोहोचवणाऱ्या पार्श्वगायक संदिप पाटील आणि पार्श्वगायक प्रवीण अवचर यांचा कमलाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने पौर्णिमेच्या शुभ दिवशी यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी दोघांनाही सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती. मातेच्या गाण्यांच्या माध्यमातून गावाची कीर्ती सर्वदूर पोहोचवणाऱ्या कलाकारांचा गावकऱ्यांनी कडकडीत टाळ्यांच्या गजरात सत्कार केला. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने कलाकारांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कलाविश्वातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी बोलताना पार्श्वगायक संदिप पाटील म्हणाले, “गायन क्षेत्रात काम करत असताना मला राज्यस्तरावर अनेक पुरस्कार लाभले. मात्र आपल्या गावातील सन्मान हा मनाला स्पर्श करणारा आहे. ही कौतुकाची थाप पुढील कामासाठी प्रेरणादायी ठरेल.”
प्रवीण अवचर यांनी देखील उपस्थित भाविकांचे आभार मानत सांगितले की, “कमलाभवानी मातेच्या कृपेनेच हे सर्व शक्य झाले. स्थानिक भाविक आणि ट्रस्टचा सन्मान हा आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे.”
संदीप पाटील हे फक्त गायक नसून करमाळा पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक जबाबदारी पार पाडत असतानाच ते आपला गायनाचा छंद देखील जोपासत आहेत.
श्री कमलाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजिलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments