Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते २५ घंटागाड्यांचे लोकार्पण

 सोलापूर शहर स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते २५ घंटागाड्यांचे लोकार्पण


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  सोलापूर महानगरपालिकेस जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून मंजूर झालेल्या ३८ घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या २५ घंटागाड्यांचे लोकार्पण आज गुरुवारदिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी महापालिकेच्या इंद्रभुवन येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले.

या लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र कोठेजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमहापालिका आयुक्त सचिन ओम्बासेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमअतिरिक्त आयुक्त श्रीमती वीणा पवार व संदीप कारंजेउपायुक्त आशिष लोकरेसहाय्यक आयुक्त शशिकांत भोसलेमुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदारसफाई अधीक्षक अनिल चराटेविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशीमुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री  गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेस एकूण ३८ घंटागाड्यांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २५ गाड्यांचे आज लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित गाड्यांची खरेदी लवकरच पूर्ण होणार आहे.

नवीन घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेत अधिक गती येणार असून दरवाजा-दरवाजा कचरा संकलन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. नागरिकांना वेळेत व सुटसुटीत सेवा मिळेलतसेच शहर स्वच्छता मोहिमेला बळकटी मिळून सोलापूर हे स्वच्छसुंदर आणि आरोग्यदायी शहर बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments