ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- ट्विंकल स्टार स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे सत्य, अहिंसा, शांती, समता, बंधुता व स्वच्छता संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान व स्वातंत्र्यसेनानी लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्याउत्साहात संपन्न झाली. शुक्रवार पेठेतील जेष्ठ नागरिक माणिकचंद कोठारी यांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे मार्गदर्शन कैलास खरसांडे, ज्येष्ठ संचालिका यशोदा गाडेकर, सचिवा अर्चना गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर, महेश कोकीळ, सोमनाथ राजमाने, संतोष वाघमारे, धनंजय भोसले, आप्पा हवलदार, सोमनाथ नलवडे, दिलीप कोठारी, रितेश भोसले इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मनीषा सोनवणे, स्वप्नाली भोसले यांनी प्रयत्न केले. स्वप्निल गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments