सोलापूर (कटुसत्य वृत्त) :-मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये बालाजी अमाईन्सतर्फे धान्य किटचे वाटप करण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी व संचालक मंडळाच्या पुढाकाराने रामहिंगणी, पोफळी, शिंगोली, तरटगाव, नांदगाव, मासाळवस्ती, मुंडेवाडी, गोटेवाडी, शिरापूर रेल्वे गेट, सावळेश्वर सर्कल तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये मदत पोहोचवण्यात आली.
मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते ही धान्य किटे वाटण्यात आली. किटमध्ये गहू, तांदूळ, तूर डाळ, रवा, पोहे, शेंगा तेल, लाल तिखट, मीठ आदी जीवनावश्यक ११ वस्तूंचा समावेश आहे.
या वेळी बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर अरुण मासाळ, पुरवठा अधिकारी घोडके, पत्रकार कृष्णकांत चव्हाण, सचिन मोरे, दत्तप्रकाश सांजेकर, पवनकुमार आदी उपस्थित होते. तसेच सावळेश्वर सर्कल ताटी येथे प्रकाश दळवी, तलाठी विशाल कांबळे, निकिता बाबर, दीक्षा सातपूते, अर्चना विटकर, सतीश बीजले यांचीही उपस्थिती होती.
डी. राम रेड्डी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. मोहोळ तालुक्याबरोबरच दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांनाही आम्ही मदत पोहोचवत आहोत. गरजेनुसार पुरवठा सुरू ठेवू.
0 Comments