गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप व २१०० विद्यार्थ्यांना स्नेहभोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- उद्योग महर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील (बापूसाहेब) यांच्या ६५व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री क्षेत्र आनंदी गणेश आनंदनगर येथील शक्तीस्थळावर समाधीस अभिवादन करून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, ईश्वरीदेवी मोहिते पाटील, देवन्या मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, शिवांशिका मोहिते पाटील, इशिता मोहिते पाटील, जयवर्धनसिंह मोहिते पाटील, यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था, आनंदनगर-अकलूज यांच्या वतीने परिसरातील गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच श्री क्षेत्र आनंदी गणेश मंदिर येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याशिवाय अकलूज येथील अकालई विद्यालयात प्रतिमापूजन करून बापूसाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उदयसिंह क्रीडा मंडळाच्या वतीने अकलूज माळेवाडी परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या सुमारे २१०० विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
या कार्यक्रमास शिवशंकर बझार च्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, सौ. ईश्वरीदेवी किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील, चि.जयवर्धनसिंह शिवतेजसिंह मोहिते पाटील, तसेच शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments