कळंब येथील मांजरा प्रकल्प बॅक वॉटर प्रभावीत ४७ कुटुंबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी.
कळंब. :-(कटुसत्य वृत्त):- केज -कळंब तालुक्याच्या सीमेवर धनेगांव तालुका केज येथे मांजरा नदीवर १९८० मध्ये प्रकल्प उभारण्यात आला असून कळंब शहरा लगतचा मांजरा नदी काठाचा भाग बॅक वॉटर क्षेत्रात येत असल्याने या भागातील घरांचे सर्वे करून पुनर्वसन करण्यात आले आहे, परंतु या क्षेत्रात असलेल्या ४२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे, या बाधित क्षेत्रातील लोकांना खरा फटका बसला तो २२,२३,२४, जुलै २००९ मध्ये मांजरा नदीला महापूर आल्याने कसबा गल्ली, मनियार गल्ली, भीमनगर या वस्तीच्या भागात पुराचे पाणी घुसल्याने या ठिकाणी वास्तव्यास असलेली कुटुंबानी तात्पुरता आसरा शोधला होता पुढे ही कुटुंबे विस्थापित झाली आहेत आज या ठिकाणी पडीक जमीनधोस्त झालेली घरे आहेत, या कुटुंबाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे त्यासाठी पाठपुरावही करण्यात आला तत्कालीन महसूल राज्यमंत्री राणा जगदीतसिंह पाटील यांनी घराच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागे विषयीचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक चर्चा केली व यासाठी जागा निश्चितीसाठी प्रयत्न झाले परंतु हे काम इतक्यावरच थांबले पुढे याकडे प्रशासनाच्या पातळीवर कसल्याच हालचाली झाल्या नाहीत व लाल बसत्यात ही मागणी बंदिस्त झाली आहे, या भागातून विस्थापित झालेल्या काही कुटुंबांना अद्यापही राहण्यासाठी जागा नाही ते भाड्याच्या रागेत राहत आहेत आमची मागणी कधी पूर्ण होणार व आम्हाला आमच्या हक्काचे घर कधी मिळणार असा प्रश्न हे विस्थापित लोक विचारीत आहेत, यातील एक विस्थापित यशवंत हौसलमल यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदन दिले असून लवकरात लवकर या विस्थापित लोकांना जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे.
0 Comments