राम नदीवर कॉलमचा नवीन पुल करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
मौजे पिंपरी (कटुसत्य वृत्त):-(आर) तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील गावाच्या हद्दीत राम नदी असून त्या नदीवर पुल आहे.कापसी, भातंबरे ,तांबेवाडी , लमाणतांडा येथील नागरिक ,शेतकरी बांधव बार्शीला (तालुका ठिकाण) तसेच इतर ठिकाणी ये जा करण्यासाठी या नदीवरील मार्गाचा वापर करतात. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी संबंधित नदी मार्गावरून ये जा करावी लागते तसेच पिंपरीतील शेतकरी बांधवांना शेतकरी पुलाचा वापर करावा लागतो. मराठवाड्यातील श्री संत गोरोबाकाका तेर यांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी राम नदीवरील पुलावरूनच जाते. वारंवार होणारी अतिवृष्टी व जीर्ण झालेला कालबाह्य पूल यामुळे संबंधित पुलावरून वाहतूक करणे बिकट झाले आहे. तसेच आतापर्यंत अनेक जनावरे, शेतकरी बांधव पुल ओलांडताना दुर्घटना घडलेल्या आहेत. आज पर्यंत मुख्यमंत्री सचिवालयाकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत.
प्रशासनाने कॉलमचा नवीन पूल उभारावा ही विनंती. योग्य ती दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर गावकऱ्यासमवेत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा शरद पाटील यांनी दिला आहे.
0 Comments