सिना महापूरग्रस्तांच्या मदतीला एम. के. फाऊंडेशनचे महादेव कोगनुरे धावले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एम के फाऊंडेशन चे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागले आहे. समाजसेवक महादेव कोगनुरे यांनी स्वतः नदीकाठच्या विविध गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली, तर काही ठिकाणी थेट पोहोचता न आल्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदतकार्य पोहोचवले. या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून कठीण प्रसंगात आधाराचा हात मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
या मदतीत फराळाचे पदार्थ,फळे, खाण्याच्या वस्तू,लहान मुलांसाठी दूध पाकिटे, पाणी बाटल्या, अन्नधान्य तसेच चादरी पूरग्रस्त कुटुंबांना वितरित करण्यात आल्या. यामुळे अनेक कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळाला.
यावेळी पूरग्रस्तांना धीर देताना महादेव कोगनुरे यांनी सांगितले की, "ही आपत्ती सर्वांची आहे. प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करून पूरग्रस्तांना आधार द्यावा," असे आवाहन त्यांनी केले. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीच्या काठी महापूर आल्याने महाभयंकर प्रलय निर्माण झाले असून शेती जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हक्काचा अन्नाचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अशावेळी शासनाने तत्काळ भरघोस मदत करून शेतकरी व नागरिकांना आधार द्यावा, सध्या नागरिकांच्या अडचणी पाहता शासनाने आणखीन तत्पर होणे गरजेचे आहे अशी अश्या व्यक्त केली..
मदतीनंतर अनेक गावांमधून नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, “समाजसेवक महादेव कोगनुरे यांच्या सहकार्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
0 Comments