सहकार महर्षी साखर कारखान्याचा 64 वा बॉयलर प्रदिपन समारंभ संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि; शंकरनगर-अकलूज या कारखान्याच्या 64 वा.बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील या उभयतांचे शुभहस्ते पार पडला.तसेच सत्यनारायण महापूजा संचालक अमरदीप विश्वासराव काळकुटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता अमरदीप काळकुटे या उभयतांचे हस्ते संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, व्हॉईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, आजी व माजी संचालक तसेच शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे सभापती, सयाजीराजे मोहिते-पाटील उपस्थित होते. यावेळी कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी कारखाना स्थापनेपासून सन 1962-63 ते आज अखेर कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेत असताना सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी लावलेल्या रोपटाचे वटवृक्षांमध्ये रूपांतर होऊन, त्याचा कार्यक्षेत्रातील सर्वच घटकांना लाभ होत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल चालू आहे. यामध्ये बोलताना त्यांनी साखर उद्योगांमधील चढ उताराचा आढावा घेतला. सद्यस्थितीत कारखान्या कडील उसाची स्पर्धा, खाजगी कारखानदारी, कमी गाळप कालावधी, साखर उतारा, उत्पादन खर्चात वाढ, ग्लोबल वार्मिंग, तोडणी वाहतूक समस्या, कामगार समस्या याबाबत विवेचन केले तसेच एफ आर पी , एम एस पी, कोजन व इथेनॉल याचे दराबाबतचे धोरण शासनाने दीर्घकालीन ठरवावे याबाबतची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च बचत व उत्पादनात वाढ यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय )याचा वापर करावा असे प्रामुख्याने नमूद केले. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आपण वेदर स्टेशन उभा करीत असून यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा. कारखान्याने ऊस तोडणी करिता प्रोत्साहन पर हार्वेस्टर मशीन अनुदान धोरण ही जाहीर केल्याचे सांगून यामध्ये कारखान्याने मशीन खरेदी करणाऱ्या सभासदास या चालू हंगामासाठी प्रत्येकी 35 लाख रुपये अनुदान अग्रक्रमाने येणाऱ्या दहा मशीन साठी देण्याचे निश्चित केले आहे. त्याचाही लाभ घ्यावा असे सांगितले. मनोगतामध्ये शेवटी त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे हे असे आवाहन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षीरसागर, गोविंद पवार, डॉ. सुभाष कटके, ॲड. जयदीप एकतपूरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक- ॲड. प्रकाशराव पाटील, रामचंद्र सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक- रणजीत रणनवरे, माजी संचालक- भिमराव काळे, विजय माने- देशमुख, राजेंद्र मोहिते, केशवराव ताटे-देशमुख, रामचंद्र चव्हाण, भारत फुले, सुभाष पताळे, सुनील एकतपूरे, किसनराव वाघ, सुरेश पाटील व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक- पांडूरंग एकतपूरे, बाळासाहेब माने-देशमुख, अनिल कोकाटे, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, राजेंद्र भोसले, विनायक केचे, श्रीकांत बोडके, नामदेव चव्हाण, सौ. हर्षाली निंबाळकर तसेच सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर यांचे स्वागत सेक्रेटरी अनिल काटे यांनी केले तर आभार संचालक गोविंद पवार यांनी मानले.
0 Comments