Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्मवीर कृषी महाविद्यालयाचे स्वयंसेवक विद्यार्थी धावले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

 कर्मवीर कृषी महाविद्यालयाचे स्वयंसेवक विद्यार्थी धावले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी




बार्शी (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टीमुळे नदीला, ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले होते.या पार्श्वभूमीवर श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना या युनिटने पूरग्रस्त नागरिकांना मदत करता यावी म्हणून रिधोरे ता. माढा येथील अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे बाधित लोकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी महाविद्यालयीन विद्याथ्यांनी स्वच्छता, आरोग्य विषयक जागृती , केळी व बिस्किटे वाटप इत्यादी  विविध कामांमध्ये स्वयंसेवक म्हणून जबाबदारीने काम करीत स्थानिक प्रशासनास सहकार्य केले. या उपक्रमाचे नियोजन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी बी शिंदे  व कार्यालयीन अधीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष शेंडे यांनी केले होते.
 या मदत कार्यातून विद्याथ्यांनी मानवी मूल्ये, सहानुभूती आणि सामाजिक बांधिलकी जपून ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्तीच्या काळातही श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेची सेवा वृत्ती अधोरेखित केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments