पतसंस्था वाढीसाठी ठेवीदार महत्त्वाचा : मा. आ. अँड. रामहरी रुपनवर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
पतसंस्थेला चांगला कर्जदार महत्त्वाचा आहे संस्था वाढवीत असताना ठेवीदार कर्जदार सर्व संभाळत कष्ट घ्यावे लागते त्यांना पाहिजे त्या क्षणाला पैसे देता आले पाहिजे आपली संस्था या भावनेने काम करा पतसंस्थेच्या वाढीला ठेवीदार महत्त्वाचा ठरतो असे प्रतिपादन माजी आ. पतसंस्थेचे चेअरमन अँड. रामहरी रुपनवर यांनी रामहरी रुपनवर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी व्यक्त केले. यावेळी संचालक राजेश चंकेश्वरा, माऊली पाटील, मा. उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, व्हा. चेअरमन अविनाश दोशी, लक्ष्मणराव सूळ, अर्जुन जठार, संतोष काळे, डॉ. आदिनाथ रुपनवर, अरविंद पांढरे, बाळासाहेब काळे, प्रा. चंद्रकांत ढोबळे, प्रा. दुर्योधन पाटील, मोहन वाघमोडे, सचिव विवेक पांढरे उपस्थित होते. यावेळी प्रा. दुर्योधन पाटील यांनी प्रस्ताविक करत असताना सांगितले की, ही पतसंस्था तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेली एकमेव नागरी पतसंस्था आहे. खेड्यातील लोकांची आर्थिक गरज भागवीत असून लवकरच पिलीव येथे नवीन शाखा सुरू करत आहोत. पतसंस्थेचे वार्षिक अहवाल वाचन सचिव विवेक पांढरे यांनी केले.यावेळी रामहरी रुपनवर नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, पतसंस्थेचे पिग्मी एजंट व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी :
पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना माजी आ.अँड. रामहरी रुपनवर
0 Comments