Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रसिद्धीसाठी महत्वाचे प्रासंगीक लिखाण - बातमी .

 प्रसिद्धीसाठी महत्वाचे प्रासंगीक लिखाण - बातमी .





नि:स्पृह भक्ती, श्रध्देचे प्रतिक - करगणीचे  बबनबापू क्षिरसागर !


सादिक खाटीक ज्येष्ट पत्रकार आटपाडी जि . सांगली .
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग महाराष्ट्र .


आटपाडी(कटूसत्य वृत्त):-
                भक्ती, श्रध्दा आणि अथक परिश्रमातून करगणीत भक्तीचा मळा फुलविणारे आधुनिक युगातील एक अवलिया व्यक्तीमत्त्व परमपुज्य बबनबापू तातोबा क्षिरसागर यांचे दि . ३१ आँगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले . सोमवार दि . १ सप्टेंबर रोजी करगणी श्री दत्त मंदिर परिसरात त्यांचे पार्थीव समाधीत दफन करण्यात आले .
                ७४ वर्षाच्या बबनबापू क्षिरसागर यांच्या मागे गणेश, मनेश ही २ मुले, आणि संध्या ही मुलगी, शकुंतलामाई या पत्नी, सूना, जावाई, नातवंडे, परतवंडे अन्य नातलगांसह हजारोंच्या संख्येतला अनेक राज्यातला भक्तपरिवार आहे .
                कै . बबनबापू क्षिरसागर यांच्या पार्थीवाची करगणीतून धार्मिक वाद्यांच्या गजरात शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढणेत आली . शेंकडोंच्या उपस्थितीत दत्तमंदिर परिसरात त्यांचं पार्थीव समाधीस्थळी धार्मीक विधी सोपस्करानंतर दफन करण्यात आले .
                अनेक पिढ्यापासून पूर्णत शाकाहारी असलेल्या बबनबापू क्षिरसागर यांच्या मागच्या ८ आणि पुढच्या पिढ्यांनी प्रचंड भक्तीभाव जपला होता . श्री . दत्त महाराज यांच्यावरील अतुट भक्ती आणि संत एकनाथ स्वामी यांची षष्टी , बबनबापू क्षिरसागर यांच्या अनेक पिढ्यांनी मोठ्या श्रध्दा - भक्तीने केली . शेतीला सर्वस्व मानून वाटचाल करणाऱ्या बबनबापू क्षिरसागर यांनी आपला पिढीजात व्यवसायही प्रारंभी केला होता . लहानपणापासून भजन, कीर्तन, प्रवचन, इतर अनेक धार्मिक, सण, वार, उत्सव, देवादिकांच्या विधिवत कार्यक्रमात, थोर संत महात्म्यांच्या जयंती पुण्यतिथीत समर्पित भावनेने सहभागी होणारा हा परिवार अनेक दशकांपासून करगणी परिसरात ओळखला जात आहे . लहानपणापासून अतुट भक्ती, श्रध्दा, तपचर्या, अथक परिश्रामातून बबनबापू क्षिरसागर सदैव कार्यरत राहीले .
                भोयगावचे सदगुरू स्वामी कचरनाथ महाराजांच्या अनुग्रह - सानिध्यातून आणि खोपोली गगणगड येथील श्री सदगुरू स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या आशिर्वादाने बबनबापू क्षिरसागर यांनी निःस्पृह सेवा,भक्तीला सुरुवात केली . प्रारंभी करगणी परिसरात दुमदुमणारा हा बबनबापू क्षिरसागर यांच्या भक्तीचा मळा देशातल्या अनेक राज्यातल्या भक्त परिवारात लोकप्रिय ठरत गेला . करगणीच्या पश्चिमेला उभारलेल्या श्री . दत्त मंदिर आणि श्री . गगनगिरी महाराजांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या त्या परिसरात भव्य दिव्य धार्मिक स्थळ साकारण्यात बबनबापू क्षिरसागर यांना १९६८ पासूनची अर्थात ६ दशकांची निष्ठापूर्वक केलेली प्रामाणिक सेवा उपयोगाला आली . या पवित्र ठिकाणी भक्ती आणि अन्नदान सेवेला प्रथम दिले जाते . श्रध्दा, भक्ती, आचार, विचार लिनता, नम्रता, शांत संयमी, सेवाभाव याचा प्रत्यय या ठिकाणी बापूंच्या कृतीतून पदोपदी जाणवत असे . नामस्मरण, श्रेष्ठ कर्मातून परमात्म्यासाठी तळमळीने सेवाधारी व्हावे याचसाठी हा मानवधर्म असल्याचे बबनबापू क्षिरसागर नेहमी सांगत .
                या धार्मीक स्थळी येणाऱ्या आबाल वृद्धांपासून माता, भगिनी, युवती , पुरुष भक्तांचे बबनबापू क्षिरसागर माऊली बनून त्या सर्वांच्या सुख दुःखात श्रध्दा भक्ती भावाने मिसळून जात . आलेला प्रत्येक भक्त चहा, नाष्टा, अन्न प्राशन करून गेला पाहिजे . गरीब, श्रीमंत, काळा, गोरा, उच्च, कनिष्ट असला भेदभाव न करता सर्वांना समानतेने, बंधुभावाने, मातृहृदयाने सामोरे जाणारे, प्रत्यक्षातही त्याच कृती - वृत्तीने वास्तवात दिसणारे बबनबापू क्षिरसागर हजारो भक्तजनांच्या गळ्यातल्या ताईता सारखे बापू या दोन प्रेमळ शब्दाक्षरांनी सर्वांच्या अंतःकरणात कधी वसले, हे अनेकांना समजलेच नाही. अगदी दारी आलेला परधर्मीयही सुखी समाधानाने आपल्या घरी गेला पाहिजे. या आपुलकीने बापू त्यां सर्वांची काळजी घेत . सर्व सजिवात, सर्व चराचरात परमेश्वर वसलेला आहे, अशी बापूंची क्षध्दा सदैव सर्वांना अनुभुतीस आली .
                वर्षभर अनेक धार्मिक उपक्रमांनी दुमदुमणारा हा परिसर देशभर वेगळी ओळख निर्माण करण्यात बबनबापू क्षिरसागर यांची आयुष्य भराची सेवा कारणी आली आहे . मंदिर - मठात येणाऱ्या हजारोंना केले जाणारे अन्नदान हा बापूंच्या निर्मळ, सात्वीक भक्तीभावाचा प्रसादच समजला जातो . तथापि हे सर्व, श्री दत्त महाराजांच्या आशिर्वादातूनच घडते आहे अशी बापूंची श्रध्दा होती .
                राज्यातील अनेक आजी - माजी आमदार, खासदार, मंत्री महोदय, उच्चपदस्थ अधिकारी, विविध क्षेत्रातले शेकडो मान्यवर बबनबापू क्षिरसागर यांच्यावर मोठ्या श्रध्देने प्रेम करीत . सर्वसामान्यांचा आश्रयदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबनबापू क्षिरसागर यांनी करगणी पंचक्रोशीसह राज्यातल्या अनेक विधायक उपक्रमांना नेहमीच सहकार्य मदत केल्याचे शेकडो लोक सर्वत्र दिसून येतील . अन्नदान श्रेष्टदान या भावार्थाने याकडे बघणाऱ्या बबनबापू क्षिरसागर यांनी दिशादर्शक जीवनाच्या खऱ्या आनंदप्राप्तीसाठी बजावलेली सेवा योगदान समाजातल्या सर्वच घटकांसाठी, मानव कल्याणासाठी, प्रेरक, मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल असेच उत्तुंग कार्य बबनबापू क्षिरसागर यांचे होते . केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते, परमपुज्य गगनगिरी महायोगी पुरस्काराने, बबनबापू क्षिरसागर यांचा गौरव केला गेला होता .
                कै . बबनबापू क्षिरसागर यांच्या पुण्यात्म्यास परमेश्वराने चिरशांती द्यावी . हे प्रचंड दुःख सहन करण्याची ताकद विधात्याने त्यांच्या परिवारास द्यावी . हीच माझी भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांच्या पवित्र आत्म्यास कोटी कोटी प्रणाम, सलाम, नमस्ते, वंदे !

Reactions

Post a Comment

0 Comments