मंद्रुप आणि अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिन्सचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे व राजस्थान रॉयल्स यांच्या वतीने तसेच महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप आणि अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिन्स देण्यात आले.
महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे म्हणाले की, “या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील सामान्य व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपयोग होऊन वेळेवर उपचार मिळावेत. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ व अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे असे उपक्रम शक्य होत आहेत.”
ग्रामीण रुग्णालय मंद्रुपचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले की, “२४ तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयासाठी हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिन्स अतिशय उपयुक्त ठरतील आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळेल.”
याशिवाय पुण्यातील ससून रुग्णालय व कराड तालुक्यातील डोणजे येथील कौशल्या ग्रामीण रुग्णालय यांनाही मशिन्स उपलब्ध करून देण्यात आले असून, एकूण ४ मशिन्सचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे ट्रस्टी सुशीला राठी, सचिव लक्ष्मीकांत नावंदर, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, योगेश बजाज, इराण्णा केंचगुंडी तसेच रुग्णालयातील डॉक्टर व प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments